Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंचे मशाल चिन्ह देखील धोक्यात

समता पक्षाचा पुन्हा मशाल चिन्हावर दावा

मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर केला असून, यानुसार शिवसेना पक्ष शिंदे गटाचाच असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यानं

अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार उदासीन
1 मेपासून मराठा समाजाचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
आरजेएस नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक क्षय दिन उत्साहात

मुंबई ः राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर केला असून, यानुसार शिवसेना पक्ष शिंदे गटाचाच असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटासमोरील अडचणी पुन्हा वाढतांना दिसून येत आहे. धनुष्यबाण चिन्हानंतर ठाकरे गटाचे मशाल चिन्ह देखील धोक्यात आले आहे. कारण या चिन्हावर पुन्हा एकदा समता पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे ’धनुष्यबाण’ या चिन्हापाठोपाठच आता मशाल हे चिन्ह देखील ठाकरेंच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचे समता पक्षाने म्हटले आहे. शिवसेना पक्ष शिंदेंकडे गेल्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं दिले होते. मात्र आता मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाकडे अर्ज 4 जानेवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. गुरूवारपासून 11 जाने. ज्या पक्षांना कॉमन पक्ष चिन्ह हवे असेल त्यांना दिले जाईल, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. त्यामुळे समता पक्ष आता चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करणार आहे. तसेच चिन्हासाठीच्या सर्व अटी पूर्ण केल्या असल्याचाही दावा समता पक्षाने केला आहे. मशाल या चिन्हावर दिवगंत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने दावा केला आहे. 1996 पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पार्टीने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. तर 2004 मध्ये समता पक्षाची राज्य पक्ष म्हणून मान्यता काढून घेत असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह बहाल केले अशी प्रतिक्रिया समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी दिली आहे. याप्रकरणी आपण निवडणूक आयोगाला इमेल पाठवून चिन्हावर हक्क सांगितला असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS