विधानपरिषद निवडणुकीत  भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

अकोला : अकोला बुलडाणा-वाशीम विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळविला आहे.खंडेलवाल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरि

बस प्रवासातच संपली इहलोकीची यात्रा…एसटीतील बेशुद्ध प्रवाशाचा मृत्यू
आगडगावचे भैरवनाथ मंदिरात आमटी भाकरीच्या महाप्रसादाला प्रारंभ
बसचा भीषण अपघात ; सात प्रवासी जागीच ठार I LOKNews24

अकोला : अकोला बुलडाणा-वाशीम विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजय मिळविला आहे.
खंडेलवाल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केलाय. वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांना 334 एवढी मते मिळाली . 31 मते बाद झाली. शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरिया यांचा 109 मतांनी पराभव झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी पाच टेबलावर घेण्यात आली. प्रत्येक टेबलावर पाच फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच सकाळी 7 वाजेपासून मतमोजणी केंद्रावर महाविकास आघाडी तसेच भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील तिन्ही मतदारसंघातील 822 मतदारांपैकी 808 मतदारांनी मतदान केले. बाजोरिया पुन्हा चमत्कार दाखवतात की खंडेलवाल त्यांची विजयी घोडदौड थांबवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्हयातील 22 मतदान केंद्रातून मतपेट्या निवडणूकीच्या दिवशी रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या. अखेर निकालाचा दिवस उजाडला. सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. यात तिन्ही जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांनी सहभाग घेतला. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य या नात्याने गेली 18 वर्षे गोपीकिसन बाजोरिया या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. परंतु राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीचे समीकरण बदलले. त्यामुळे भाजपने उद्योगपती वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बाजोरिया आणि खंडेलवाल यांच्यात तुल्यबळ लढत झाली.

COMMENTS