Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य नाहीच; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून चर्चेला पूर्णविराम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरू असले

एसटी महामंडळाने प्रवाशांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावाउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; ‘राजामाता जिजाऊ’ बससेवेचे लोकार्पण
बळीराजाला मोठा दिलासा; शेतकरी कर्जमाफीची घोषणा
परळीच्या विकासासाठी ‘दादां’च्या शिलेदाराचे मोठे पाऊल ; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेटपरळीत 48 कोटींचा काँक्रीट घोटाळा? नैसर्गिक नाले व सरस्वती नदी वाचविण्याची मागणीपाणी अडवा, पाणी जिरवाला हरताळ ; नदीत काँक्रीटीकरणाविरोधात माजी नगराध्यक्ष आक्रमकबोगस विकासकामांची चौकशी करा ; दोषींवर कारवाईची मागणीस्व. अजितदादा पवार यांच्या नावाने शैक्षणिक प्रकल्प व भव्य पुतळ्यासाठी पुढाकार – दिपक देशमुख

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. सुमारे पंधरा दिवसांपासून या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.
दिल्लीतील भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी सुनील तटकरेही उपस्थित होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना तटकरेंनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आम्ही आमची स्वतंत्र ओळख कायम ठेवूनच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी आहोत. विलीनीकरणाचा प्रश्‍न सध्या तरी उद्भवत नाही, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांत अजित पवारांनी दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा होती. शरद पवार यांनीही एकत्र येण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केल्याचे बोलले जात होते. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याच्या शक्यतेवरूनही राजकीय अंदाज वर्तवले जात होते. तसेच काही वरिष्ठ नेते विलीनीकरणास विरोध करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र तटकरेंच्या विधानानंतर या सर्व तर्कवितर्कांना आळा बसला आहे. दरम्यान, 17 फेब्रुवारी रोजी मुंबईत शरद पवार यांनी आपल्या गटातील आमदार व पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील राजकीय दिशा ठरवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तटकरे यांनी स्पष्ट केले की, 2014 आणि 2019 पासून भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हावे, ही अजित पवारांची ठाम भूमिका होती. पक्षाच्या अंतर्गत बैठकींमध्ये त्यांनी हे मत सातत्याने मांडले होते. तीन पक्षांच्या आघाडीपेक्षा दोन पक्षांचे स्थिर सरकार राज्याच्या विकासासाठी अधिक परिणामकारक ठरेल, असा त्यांचा विश्‍वास होता, असे तटकरेंनी सांगितले.

COMMENTS