Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर सुजीत पाटकरला जामीन मंजूर

मुंबई ः कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना किल्ला कोर्टाने मोठा दिल

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
२०२४ मध्ये भाजप आणि शिवसेना २०० प्लस जागा जिंकु – चंद्रशेखर बावनकुळे
परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…

मुंबई ः कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना किल्ला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात सुजीत पाटकर यांना जामीन मंजूर झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळातील कथित जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळाचे आरोप सुजित पाटकर यांच्यावर होते. अनेकदा छापेमारी आणि चौकशीनंतर ईडीकडून सुजीत पाटकर यांना ऑगस्ट 2023 मध्ये अटक करण्यात आली होती. आता तब्बल पाच महिन्यानंतर किल्ला कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

COMMENTS