Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमधील ग्रामीण पॉलीटेक्निकमधील विद्यार्थिनीची आत्महत्या

नांदेड : नांदेड शहरातील विष्णुपुरी परिसरात असलेल्या ग्रामीण पॉलीटेक्निक महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वस्तीगृ

किनवटमध्ये वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ’अटल आनंद घनवन’ उपक्रमाचा शुभारंभ; 9,000 वृक्षांची होणार लागवड!
मुंबईतील आझाद मैदानावर वज्रमूठ आंदोलनासाठी लाखोंनी जमावे : प्रा. रामचंद्र भरांडे यांचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले

नांदेड : नांदेड शहरातील विष्णुपुरी परिसरात असलेल्या ग्रामीण पॉलीटेक्निक महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने वस्तीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात तसेच शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सानिका खांडरे (वय अंदाजे 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची ग्रामीण भागातील असून शिक्षणासाठी नांदेड येथे राहत होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास वस्तीगृहातील तिच्या खोलीत तीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. काही वेळ ती बाहेर न आल्यामुळे सहाध्यायी विद्यार्थिनींना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वॉर्डन व इतरांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता ही घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, शैक्षणिक ताणतणाव किंवा वैयक्तिक कारणांमुळे हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तसेच वस्तीगृह व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. संबंधित महाविद्यालय प्रशासनाने या घटनेबाबत दुःख व्यक्त करत विद्यार्थ्यांना समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सारिकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

COMMENTS