Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाठीहल्ल्याचे पडसाद दुसर्‍या दिवशीही तीव्र

राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलने करत केला निषेध

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः जालनामध्ये पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद रविवारीही राज्यभर उमटले असून, ठिकठिकाणी आंदोलकांकडून न

अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; राज्यमंत्रीही घेणार शपथ
Gangapur पत्नीने पतीच्या मैत्रिणीला धु धु धुतले. l LokNews24

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः जालनामध्ये पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद रविवारीही राज्यभर उमटले असून, ठिकठिकाणी आंदोलकांकडून निषेध करण्यात येत आहे. तसेच विविध जिल्ह्यात आज सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. मराठा समाजासह काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गटाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. ठिकठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी, रास्ता रोको करण्यात येत आहे.
 सोलापूर जिल्ह्यात रविवारी अनेक ठिकाणी टायर जाळण्यात आले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टर्सना जोडे मारण्यात आले. यावेळी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातही मराठा संघटनांकडून ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत दादर प्लाझा येथे सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मराठा समाजात नावारूपाला आलेले नेते विकले गेले असून काहीजण आता सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते झाले, अशी टीकाही करण्यात आली. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यामुळे सातारा जिल्ह्यातही असंतोषाचा भडका उडाला. या घटनेचा निषेध करीत सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज तीव्र आंदोलने करण्यात आली. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सातारा येथील पोवई नाक्यावर सकाळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक विवेकानंद बाबर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. कराडमध्ये मराठा मोर्चाचे संघटक अनिल घराळ यांच्या नेतृत्वाखाली ‘रास्ता रोको’ करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातही याचे पडसाद उमटले असून काही ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव येथे धान्याच्या शासकीय गोदामास आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयाचे नुकसान झाले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको करण्यात आले. तर सेनगाव येथे दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. रविवारी आखाडा बाळापूर, दिग्रस आमि कर्‍हाळे येथे रास्ता रोको झाले. आज सोमवारी मराठा समाजाने हिंगोली जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे.

दगडफेकीनंतरच लाठीमार ः डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण – जालन्यातील घटनेवर भाष्य करतांना पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्‍वर चव्हाण म्हणाले, मंगळवारपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावत होती. तसा डॉक्टरांनी आम्हाला अहवाल दिला. त्यानुसार, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ते तयारही झाले होते. पण, काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलिस कर्मचार्‍यांवर दगडफेक केली. एसआरपीचे जवान जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला, असा खुलासा चव्हाण यांनी केला. आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. 40 आरोपींना अटक केली. एसआरपीच्या तीन कंपन्या मिळाल्या आहेत. बाजूच्या ठाण्यातून फोर्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली आहे.

COMMENTS