Homeताज्या बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेत प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे यश

लोणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रव

‘ह्या मन मंदिरातून’ कवितासंग्रह जीवनमूल्यांचा ज्ञानदीप : सेंदोरे
निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ.दुधाट
राहुरी फॅक्टरीच्या भूमिपुत्राने खरेदी केले स्व-मालकीचे हेलिकॉप्टर 

लोणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दुर्गापूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयातीने यश संपादन केले. येथील विद्यार्थिनी मानवी राहुल दिवे हिने उल्लेखनीय यश संपादन करत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळविली असल्याची माहिती प्राचार्य संजय शेळके यांनी दिली.ग्रामीण विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीची माहिती देण्याबरोबरच  या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळावे या दृष्टीने संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील या विशेष प्रयत्नशील असतात आणि यातूनच दिवे यांचे हे यश विद्यालयाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लिलावती सरोदे आदींनी अभिनंदन केले आहे

COMMENTS