Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

अहिल्यानगर : दिवाळीच्या मंगल पर्वावर अखंड मराठा साम्राज्य फाऊंडेशन तर्फे आयोजित ‘एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी’ या प्रेरणादायी उपक्रमाला

नांदेडकरांवर ‘स्मार्ट मीटर’चा दबाव? अखंड वीजपुरवठा देण्यात अपयशी ठरलेल्या महावितरणची नवी मोहीम
नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; 30 लाखांचा गुटखा जप्त, आरोपी अटकेत
सावित्री-ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी
Displaying IMG-20251020-WA0029.jpg

अहिल्यानगर : दिवाळीच्या मंगल पर्वावर अखंड मराठा साम्राज्य फाऊंडेशन तर्फे आयोजित ‘एक दिवा आपल्या स्वराज्याच्या देवासाठी’ या प्रेरणादायी उपक्रमाला शेकडो शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.

      सोमवारी संध्याकाळी शिवतीर्थ – छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, माळीवाडा बसस्टॅण्ड येथे, दीप प्रज्वलन करून उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शेकडो दीपांनी शिवतीर्थ परिसर उजळून निघाला आणि “जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी!” या जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. वातावरणात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा आणि शिवसंस्कारांची प्रेरणा अनुभवायला मिळाली. कार्यक्रमामागील हेतू सांगताना फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “तरुण पिढीमध्ये स्वराज्याच्या स्मृती जागृत करत, शिवसंस्कार रुजविणे हेच या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

      या प्रसंगी संदीप नवसुपे, मनोज सोनवणे, गोरख दळवी, अशोक गाडे, मनोज बारस्कर, गोरक्षनाथ पटारे, सिद्धांत पानसरे, निलेश सूंबे, वैभव भोगाडे, सागर शेळके, रामभाऊ सातपुते, भारत भोसले, गणेश नाईकनावरे, सौरव गांगर्डे, अनुराधाताई येवले, स्वातीताई जाधव यांच्यासह अनेक शिवप्रेमींनी उपस्थित राहून दिव्यांद्वारे स्वराज्याला वंदन केले.

   कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थितांनी “स्वराज्याच्या तेजात आपला दिवा लावा” या संदेशाने दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

COMMENTS