Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा राहुल नार्वेकरांना इशारा

मुंबई प्रतिनिधी- सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे

एक लाख लोकांनी सूर्यनमस्कारातून केली राष्ट्रवंदना
गुंड नीलेश घायवळची रिल्स व्हायरल करून दहशत
आशिष देशमुखांवर हकालपट्टीची टांगती तलवार

मुंबई प्रतिनिधी- सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही हा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यादरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली आहे. तसेच, त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही योग्य तो निर्णय घेण्याचा इशाराच दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावं की नाही? यासंदर्भात आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राहुल नार्वेकर सध्या लंडनमध्ये असून ते परत येताच यासंदर्भातल्या कारवाईला सुरुवात करणं अपेक्षित आहे.

COMMENTS