Homeताज्या बातम्यासंपादकीय

इंडियातील जागावाटपांचा घोळ

देशामध्ये 2014 पासून विरोधकांची शक्ती क्षीण झाली आहे. देशामध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवून 9 वर्ष पूर्ण झाली आहेत, या 9 वर्षांमध्ये देशामध्ये अजू

डपफेक व्हिडीओचे तंत्रज्ञान घातकच
समृद्धी नव्हे मृत्यूचा महामार्ग
मराठा-ओबीसी संघर्षाचा नवा अध्याय

देशामध्ये 2014 पासून विरोधकांची शक्ती क्षीण झाली आहे. देशामध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवून 9 वर्ष पूर्ण झाली आहेत, या 9 वर्षांमध्ये देशामध्ये अजूनही प्रबळ असा विरोधी पक्ष उभा राहू शकलेला नाही. शिवाय काँगे्रसने प्रादेशिक पक्षांसह विरोधक पक्षांना सोबत घेत मजबूत अशा इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. भाजपला हरवणे हा मुख्य उद्देश घेऊन जन्माला आलेल्या या इंडिया आघाडीतच मेळ नसल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, इंडिया आघाडीतील पक्षामध्ये नसलेला समन्वय. एकत्र लढायचे शिवाय जागाही जास्त हव्या, शिवाय आपलाच पक्षाचा प्रमुख चेहरा पंतप्रधानपदाचा चेहरा हवा, अशी सुप्त इच्छा सर्वंच पक्षांची असल्यामुळे इंडिया आघाडी अजून किती दिवस तग धरेल, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. काँगे्रसला अध्यक्ष मिळूनही काँगे्रस नेतृत्व निर्णय गतीने घेतांना दिसून येत नाही. महाराष्ट्रात वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यास इच्छुक आहेत, त्यांनी तसा प्रस्ताव काँगे्रसला दिला आहे, मात्र काँगे्रसकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅड. आंबेडकरांच्या सभेला प्रचंड गर्दी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे आंबेडकर स्वतंत्र लढल्यास त्याचा सर्वात मोठा फटका इंडिया आघाडीला बसेल, त्यामुळे इंडिया आघाडीने आंबेडकरांना सोबत घेण्याची गरज असतांना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इंडिया आघाडी पायावर धोंडा पाडून घेतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता इंडिया आघाडीला निर्णय घेण्याचा लकवा झाल्यामुळे इतर पक्षाचे भवितव्य देखील अंधारात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून काँगे्रससह अनेक प्रादेशिक पक्ष सत्तेपासून दूर आहेत. शिवाय यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचार इतका आहे की, अजून भाजप त्या भांडवलावर पुढील अनेक वर्षे सहज काढू शकतो. असे असतांना, विरोधकांनी एकत्र येत जी मोट बांधली आहे, त्या समान कार्यक्रमावर सर्वांनी सहमती करून पुढे जाण्याची गरज आहे. राजधानी दिल्लीत तब्बल साडेतीन महिन्यानंतर इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्य म्हणजे जागावाटपावर चर्चा होणे अपेक्षित होते. आगामी लोकसभा निवडणुकांना दोन-तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जागा फायनल झाल्यास त्या त्या पक्षाला त्या जागेवर आपल्या उमेदवाराला ताकद देता येईल, त्या उमेदवाराला देखील पूर्वतयारी करता येईल, त्यामुळे जागा वाटप आधीच होणे सोयीचे झाले असते, मात्र जर जागा वाटप आत्ताच झाल्यास अनेक प्रादेशिक पक्ष या इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात, अशी भीती काँगे्रसला वाटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँगे्रस सध्या जागा वाटप करण्यास अनुकूल नसल्याचे दिसून येत आहे.  इंडिया आघाडीतील पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढणे ही विरोधकांची गरज आहे. मात्र तरी देखील विरोधक विरोधी सूर आळवतांना दिसून येत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील बेबनाव दिसून येत आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँगे्रसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत काँगे्रसला 31 डिसेंबरपर्यंत जागा वाटपाबाबतचा निर्णय घेण्याचा इशाराच दिला आहे. वास्तविक पाहता इंडिया आघाडीकडून जागा वाटप आणि पंतप्रधानपदाचा चेहरा या दोन बाबी मुख्य आहेत. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदाला मुरड घालत काँगे्रसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावा असा प्रस्ताव मांडल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या सुचनेला केजरीवाल यांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र या प्रस्तावामुळे खरगे यांची गोची झाल्याचे दिसून येत आहे. एकतर खरगे दलित असल्यामुळे ते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतात, तसेच इंडिया आघाडीची मूठ एकजूठ तेच ठेऊ शकतात, हा विश्‍वास इतर पक्षांना आहे. मात्र काँगे्रसचे अध्यक्ष खरगे असले तरी, ते पंतप्रधान पदाच्या नावाला पाठिंबा देऊ शकत नाही, कारण पक्षाच्या नेत्या सोनिया गांंधी, राहुल गांधी यांच्या सहमतीनंतरच ते पाठिंबा देतील असेच चित्र असल्यामुळे त्यांनी ममता बॅनर्ती यांच्या प्रस्तावाला फाटा देत आधी जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले. त्यामुळे जागा वाटपांचा घोळ अजून किती दिवस असाच सुरू राहणार आहे, यावर इंडिया आघाडीची आगामी रणनीती ठरणार आहे.

COMMENTS