Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावरून अटक

मुंबई : लंडनमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय मतप्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर आगमन

सोनू कल्याणकर खून प्रकरणाला नवे वळणगोलू मंगनाळेच्या आईसह 5 जणांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
एअर इंडियाच्या वैमानिकाला अटक आणि जामीन
मुंबई विमानतळावर 37 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड29 किलो सोन्यासह 24 महिलांना केली अटक

मुंबई : लंडनमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय मतप्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर आगमनानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी चिंता व्यक्त केली असून, प्रशासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. पाटील यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव रोखण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ड. असीम सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. डॉ. संग्राम पाटील हे मूळचे वैद्यकीय व्यावसायिक असून ते सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी युट्युब आणि फेसबुकसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे आरोग्यविषयक जनजागृती केली होती. विज्ञानाधिष्ठित माहिती देण्यासोबतच त्यांनी तत्कालीन धोरणांवर आपली मते मांडली होती. याच पार्श्‍वभूमीवर त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर काही काळ मर्यादा घालण्यात आल्याचा अनुभव त्यांनी यापूर्वी शेअर केला होता. दरम्यान, या प्रकरणावर प्रशासनाकडून अधिकृत माहिती येण्याची प्रतीक्षा असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS