Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूर तहसीलदारांची वाळू माफियांवर ‘सर्जिल स्ट्राईक’!

श्रीरामपूर : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, तहसीलदार मिलिंदकुमार

आदिवासी शाळेतील मुलीने केले आत्मदहन
मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार कधी?; नांदेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
Displaying a3.jpeg

श्रीरामपूर : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या पाच दिवसांपासून वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरू केला आहे. या धडक मोहिमेत केवळ साहित्याची जाळपोळच केली नाही, तर जप्त केलेली वाळू थेट घरकुल लाभार्थ्यांना देऊन प्रशासनाने आपली प्रतिमा उंचावली आहे.श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने १५ ते १९ डिसेंबर दरम्यान ही मोठी कारवाई केली. विशेष म्हणजे, गोवर्धनपूर येथे नदीपात्रातील चप्पू शोधण्यासाठी चक्क नगरपालिकेच्या डिझेल बोटीची मदत घेण्यात आली. १८ आणि १९ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल १० चप्पू तोडून जाळण्यात आले असून, सुमारे अडीच लाख रुपयांची मालमत्ता खाक करण्यात आली आहे.

COMMENTS