Homeताज्या बातम्या

लेंडी प्रकल्पातील घळभरणीच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी शिवसेना (ठाकरे)चे ’हलगी बजाओ’ आंदोलन

मुखेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित लेंडी प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची स

अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी राजकारण तापले आ.गोपीचंद पडळकरांच्या कथित व्हिडिओवरून चौंडीत संतापाची लाट
किनवटच्या जंगलात ’स्लो पॉयझन’; रसायनांच्या इंजेक्शनने ’धवाडा’ वृक्षांची कत्तल! वनअधिकारी आणि परप्रांतीय व्यापार्‍यांचे साटेलोटे? शिवसेनेसह निसर्गप्रेमींचा आंदोलनाचा इशारा
विविध मागण्यासाठी चंदगड तहसीलवर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा



मुखेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित लेंडी प्रकल्पातील घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि सुजाता कन्स्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने देगलूर येथे ’हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले.
भक्तापूर रोडवरील लेंडी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी कार्यकारी अभियंता प्रणव मुदगल यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र-तेलंगणा राज्यातील शेतकर्‍यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीच्या कामात निकृष्ट दर्जाची माती, मुरूम व रेतीचा वापर केला जात आहे. तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातूनच खोदकाम करून साहित्य वापरले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके (देगावकर), देगलूर शहरप्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख तथा सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, युवा सेना शहरप्रमुख विनोद सोनकांबळे, शहर समन्वयक संतोष कांबळे, शहर संघटक मष्णाजी पैलावार, उपविभाग प्रमुख हाणमंत राजुरे लख्खेकर, तालुका सचिव शिवाजी सोनकांबळे (मुजळगेकर) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सहाय्यक निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक आडेकर, जमादार सगरोळीकर तसेच तामलवाडी, बेग, ठाकूर, बोलमवाड आदी पोलीस कर्मचार्‍यांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

COMMENTS