Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नीट नाचता येत नाही का…म्हणत केली मारहाण

हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने राडा

अहमदनगर प्रतिनिधी - तू मला धक्का का मारला? तुला नीट नाचता येत नाही का?, असे म्हणत एकाला चार-पाचजणांनी बेदम मारहाण केली. ही घटना नगरच्या सावेडी

आदिवासी महिलेवर पोलिसांनीच केला बलात्कार
कर्जतच्या तहसीलदारांकडून उत्खनन पंचनाम्यास टाळाटाळ
शिंगणापूर पोस्ट विभागाची मोबाईल बँकीग सेवा दीड महिन्यांपासून बंद

अहमदनगर प्रतिनिधी – तू मला धक्का का मारला? तुला नीट नाचता येत नाही का?, असे म्हणत एकाला चार-पाचजणांनी बेदम मारहाण केली. ही घटना नगरच्या सावेडी परिसरातील तपोवन रोडवरील सूर्यनगरी येथील एसटी कॉलनीत हळदीच्या कार्यक्रमात घडली. पोलिसांनी याप्रकरणी आदित्य जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जाईद शेख, प्रताप गायकवाड, अमन शेख, अक्षय चाफेकर (सर्व रा. थ्री डी कॉर्नर, तपोवन रोड, अहमदनगर) व इतर अनोळखी चार ते पाच जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतची माहिती अशी की आदित्य बापूराव जाधव (वय 20 वर्ष, रा. हनुमान मंदिराजवळ, सूर्यनगर, तपोवन रोड, अ.नगर) हा त्याचा मित्र सागर गुंड (रा. एसटी कॉलनी, सूर्यनगर, नगर) याच्या घरी त्याच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी आदित्य जाधव व कृष्णा विधाते तसेच अन्य महिला व पुरुष गेले होते. तेथे गाण्याच्या आवाजावर नाचत असताना जाईद शेख, प्रताप गायकवाड, अमन शेख, अक्षय चाफेकर असे हळदीच्या कार्यक्रमास आले होते आणि ते देखील नाचत होते. नाचत असताना जाईद शेख आदित्यला म्हणाला, तू मला धक्का का मारला? तुला नीट नाचता येत नाही का? तेव्हा आदित्य त्यास म्हणाला, मी बाजूला नाचत आहे व मी तुला धक्का मारला नाही, असे म्हणताच जाईद शेख याने आरडाओरडा करुन आदित्यला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यावेळी प्रताप गायकवाड, अमन शेख, अक्षय चाफेकर व अनोळखी चार ते पाचजणांनी आदित्यला तू जाईद शेखला धक्का का दिला, असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून चार-पाच जणांनी एकास शिवीगाळ वदमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्याच्या या घटनेने तपोवन रोड परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणार्‍या आरोपींचा शोध सुरू केला आहे.

COMMENTS