Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोल्यात बळीराजाची मिरवणूक उत्साहात

अकोले ः  बळीराजा गौरव समितीच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून बलिप्रतिपदेच्या दिवशी दरवर्षी अकोले शहरातून महात्मा बळीराजाची मिरवणूक काढली जाते. या

LokNews24 l हॉटेलवर अज्ञाताचा गोळीबार
ग्रामपंचायतींच्या रिक्त पावणेतीनशे जागांचा वाजला बिगुल…
सर्वसामान्यांच्या बळावरच विधानसभा लढवणार ः हर्षदाताई काकडे

अकोले ः  बळीराजा गौरव समितीच्या वतीने गेल्या 11 वर्षांपासून बलिप्रतिपदेच्या दिवशी दरवर्षी अकोले शहरातून महात्मा बळीराजाची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत अकोले तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. विविध शेतपिकांनी सजवलेल्या बैलगाडीतून महात्मा बळीराजाची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
       छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गावातील प्रमुख पेठांमधून वाद्यांच्या गजरात मिरवणूक गेली तेंव्हा ठिकठिकाणी भगिनींनी बळीराजाला इडा पिडा टळो, आणि बळीचे राज्य येवो असे म्हणत ओवाळले. मिरवणुकीच्या मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुल्यांच्या पुतळ्यांना बळीराजाच्या हस्ते पष्पहार अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाची सांगता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात बळीराजाच्या हस्ते उपस्थितांना पानसुपारी देऊन करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. विजय भगत, डॉ.अजित नवले,सोमनाथ नवले, भाऊ चासकर, अशोक मंडलिक, विनोद हांडे, डॉ. संदीप कडलग, दिलीप शेणकर, प्रा. बबन पवार, प्रा.दिनकर दळवी आदींची भाषणे झाली.  वक्त्यांनी आपल्या भाषणात बळीराजाचा इतिहास सांगून बळीराजाच्या गुणांचे वर्णन केले व आर्य आक्रमकांनी दडपलेल्या अनार्य संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता विशद केली. तसेच आर्यांनी विकृत केलेल्या अनार्यांच्या इतिहासाचे शुद्धीकरण करून महात्मा बळी, आदिमाता निरुती, आदिमाता शुर्पनखा, आदिमाता काली,  हिरण्यकश्यपू,  नरकासुर, प्रल्हाद, विरोचन, खंडोबा, म्हसोबा, बिरोबा, बुद्ध, महावीर, महानुभाव, नामदेव, कबीर, तुकाराम, छत्रपती शिवशंभू, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या महान समतावादी परंपरेचे स्मरण केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप कडलग, डॉ.अजित नवले, सुधीर रूपवते, शिवम भोर, पंढरीनाथ करंडे, प्रा.संदेश कासार, डॉ. भोर प्रा. दळवी, वी. विजयजी भगत, वसंतराव मनकर, प्रमोदजी मंडलिक, अशोक मंडलिक, सचिन गवांदे, बाळासाहेब शिंदे, निलेश रूपवते, प्रलेश रूपवते, सुनीता रूपवते, शीतल रूपवते, संजयकुमार शिंदे, दिलीप शेणकर, विकास पवार, बाळासाहेब खरात, विशाल दारोळे, सुभाष बगणर, दत्तात्रय नवले, जाधव, काळू तपासेप्रा. डॉ. नितीन आरोटे, प्रा.बबन पवार, रवी रूपवते, रवी मेढे चंद्रविलास गव्हाणे,  संजय शिंदे, कल्पना नेहरे, सुंनदाताई मेढे, रोहन पवार, आशिष पडवळ, मुकुंद भोर, आमन आरोटे, राजेश पावसे, भागवत लेंडे सर,संतोष शिंदे, विठ्ठल माने, अनिल मोहिते, चंद्रभान मेंगाळ, भाऊ चासकर, प्रशांत जगताप, भागवत त्रिभुवन, सोमनाथराव नवले, वीरेंद्र मेढे, जादूगार हांडे, अमोल शेणकर, आदींनी परिश्रम घेतले. विरेंद्र मेढे यांनी बळीराजाची भूमिका वठवली. यावेळी प्रा. दिनकर दळवी, सुनंदा दळवी, सुदिन दळवी, राजश्री पवार, अस्मिता पवार, गाथा कल्पना विजय, सलिम शेख, घोडके, अग्रलेखा खरात, अंतरा खरात, सुनयना रूपवते, सार्थक रूपवते, हर्षद जगताप, हर्षदा जगताप, शर्वरी बोराळे, जनाबाई बोराळे, संतोष बोराळे, संघमित्रा बोराळे, रुपेश रूपवते, परिनिता रूपवते, सागर शिंदे,हेमंत आवारी बहुजन समाजातील विविध पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

COMMENTS