Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शनैश्वर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण अखेर मागे

शनि शिंगणापूर : श्री शनैश्वर देवस्थान येथील नवीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. सात महिन्य

राहात्यात आजही रंगतो ‘गळी लागण्याचा’ थरार! हवेत लटकत ‘गळवंती’ ला लावली जातात लहान मुले;  शेकडो वर्षांच्या परंपरेचे जतन
‘गरीब विद्यार्थी फंडा’त १९ लाखांची जमा; दादा पाटील महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम
‘समर्थ क्रॉप केअर’कडून कोट्यवधींची फसवणूक; वाढीव व्याजाचे आमिष; एजंट-गुंतवणूकदार हाणामारीनंतर प्रकार समोर

शनि शिंगणापूर : श्री शनैश्वर देवस्थान येथील नवीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले आहे. सात महिन्याचे प्रलंबित मानधना संदर्भात प्रशासन आणि कर्मचारी यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी उपोषणकर्ते यांच्या बरोबर सकारात्मक सवांद साधला.वेतना संदर्भात शासन पातळीवर मार्गदर्शन मागवले आहे. यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती कर्मचारी प्रतिनिधी यांना केली असता त्यांनी चर्चेतून उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

शनिशिंगणापूर येथे दि. ३० मार्च २०२६ पासून देवस्थानच्या नवीन कर्मचाऱ्यांनी ७महिन्याचे वेतन मिळावे या प्रमुख मागणी संदर्भात उपोषण सुरू केले होते. सुमारे चार दिवस कर्मचाऱ्यांनीं उपोषण केले होते. पण देवस्थान प्रशासनाने नवीन कर्मचारी भरती प्रकरण हे न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत आम्हाला निर्णय घेता येणार नाही असे सांगितले.गेले चार दिवस उपोषण करून कर्मचाऱ्यांच्या मानधना बाबत व इतर मागण्या बाबत ठोस निर्णय  कायदेशीर बाबी मुळे झाला नाही. तसेच याबाबत कर्मचारी प्रतिनिधी कडून मिळालेल्या माहितीनुसार दि. ७ एप्रिल रोजी सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे थकीत वेतना संदर्भात बैठीकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीत वेतना संदर्भात ठोस निर्णय झाला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचे कर्मचारी प्रतिनिधीनीं सांगितले.

याबाबत देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि या नवीन अतिरिक्त कर्मचारी भरती बाबत तत्कालीन विश्वस्त मंडळाला मुंबई धर्मदाय आयुक्त यांनी ४१डी नुसार नोटीस दिली होती. याबाबत सध्या सुनावणी सुरु आहे. सदर भरतीची बाब न्याय प्रविष्ठ असल्याने याबाबत आम्हाला निर्णय घेता येणार नाही. याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शन मागवले आहे. ते प्राप्त होताच निर्णय घेता येईल.या सर्व कायदेशीर बाबी संदर्भात कर्मचारी प्रतिनिधी यांच्याशी सुसंवाद साधला आणि चर्चेतून कर्मचाऱ्यांनीं स्वतःहुन उपोषण मागे घेतले आहे.

दरम्यान समाज माध्यमातील लोकप्रिय  सामाजिक कार्यकर्ते रविराज साबळे पाटील शनी दर्शनाला आले असता त्यांनी देवस्थान कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नावर उपोषणास भेट दिली. यावेळी त्यांनी नेवासाचे आ.विठ्ठलराव लंघे यांच्याशी फोनवर संवाद साधत कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात देवस्थान प्रशासना बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे सांगितले.

COMMENTS