Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

परराज्यांतील चार महिलांची पोलिसांनी केली सुटका

पुणे/प्रतिनिधी ः परराज्यातील मुलींना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या टोळींचा पुणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश करत या टोळीच

शिवछत्रपतींचे विचार देशभर रुजविणे हेच आद्य कर्तव्य : देसाई
मशाल चिन्ह कायम राहणार ठाकरे गटाला सर्वोच्च दिलासा
गृहमंत्र्यांच्या शहरात दोन व्यापार्‍यांची हत्या

पुणे/प्रतिनिधी ः परराज्यातील मुलींना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणार्‍या टोळींचा पुणे पोलिसांनी बुधवारी पर्दाफाश करत या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांना या वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले होते. त्यांना पुणे शहरात बोलावुन त्यांना वेश्या व्यवसाकरीता पंचतारांकीत हॉटेल येथे पाठवुन सेक्स रॅकेट चालवणार्‍या टोळीवर सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. याबाबत दोन पिडीत मुली व तीन आरोपी मिळुन आले आहेत. त्यांना ताब्यात घेवुन तीन आरोपी यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल अशा ठिकाणांवरून आलेल्या 4 पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार परराज्यातील मुली, महिला यांना काही इसमांनी व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी पुणे शहरात बोलावून घेतले. त्यांना वेश्या व्यवसायाकरिता पुरवित असल्याबाबत सामजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर अशा एजेंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढून सामाजिक सुरक्षा विभागाच्या वतीने सापळा रचुन बनावट ग्राहक बनवून वेश्या गमनासाठी मुलींबाबत विचारणा केली, असता एजंटने पुणे स्टेशन परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन रुम बुक करण्यास सांगितले. त्यांनतर या ठिकाणी दोन मुली हॉटेलमधील बनावट ग्राहक थांबलेल्या रुममध्ये आल्या. नंतर अचानक छापा टाकला असता, या ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवून विचारपुस केली. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच आणखी दोन मुली एजेंटसह देवडा परिसरात असल्याची माहिती मिळाली. लगेच तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून महाराष्ट्र हौसींग सोसायटी येरवडा, पुणे येथुन दोन पिडीत मुली व तीन एजंट मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन तीन आरोपी यांच्याविरूध्द बंडगार्डन पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चार पीडित मुलींची सुटका यातून करण्यात आली आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलिस स्टेशनकडील पोलिस अधिकारी करीत आहेत.

COMMENTS