जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून पोहत केला वीज पुरवठा सुरळीत.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून पोहत केला वीज पुरवठा सुरळीत.

इगतपुरीतील कर्मचाऱ्याचा थरारक व्हिडिओ.

नाशिक प्रतिनिधी- नाशिक(Nashik) शहरासह जिल्ह्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने सुरळ

सुशांतसिंहचा हत्यारा कोण?; नवाब मलिक यांचा सवाल l पहा LokNews24
गणेश भोसने बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पटकावले ब्राँझपदक
न्यायालयाच्या आदेशाचा सोयीने अर्थ लावू नका

नाशिक प्रतिनिधी- नाशिक(Nashik) शहरासह जिल्ह्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यात झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. अशातच इगतपुरी(Igatpuri) येथील महावितरणच्या( Mahavidran) कमर्चाऱ्याचा काळजाचा थरकाप उडविणारा व्हिडिओ समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान मुकणे धरणाच्या( Mukne Dam) परिसरात रायंबे(Raymbe) येथील वीज पुरवठा खंडित झाल्याने इगतपुरीचे कर्मचारी थेट पुराच्या पाण्यातून पोहून जात असल्याचा व्हिडिओ  समोर आला आहे. हा कर्मचारी पोहून जात विजेच्या खांबावर चढून जात विद्युत पुरवठा सुरळीत करीत असल्याचे व्हिडिओतुन दिसते आहे. ऐन पावसाळ्यात स्वतःचा जीव धोक्यात घालत महावितरणचे कंत्राटी कर्मचारी कशा पद्धतीने कामं करतात, याचे उदाहरण या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.

COMMENTS