Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या दोन खेळाडूंची महाराष्ट्र  संघात निवड

कोपरगाव ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ओम रविंद्र अडसुरे याची महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात तर हर्षल  राजु

सरनाई यांच्या पत्राची लिंक ठाकरे-मोदी भेटीत! l DAINIK LOKMNTHAN
Video : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ

कोपरगाव ः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ओम रविंद्र अडसुरे याची महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघात तर हर्षल  राजु जेजुरकरची महाराष्ट्राच्या  टेनिस व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने संजीवनी ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच इतरही क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

       महाराष्ट्र  राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन व सोलापूर जिल्हा  सॉफ्टबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने वडाळा, सोलापूर येथे राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात अहमदनगर जिल्ह्याच्या 16 खेळाडूंच्या संघात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ओम रविंद्र अडसुरे, कुणाल राहुल भुजबळ, सत्यम सोमनाथ ठुबे व अनुराज बाळासाहेब तांबे या खेळाडूंचा समावेश  होता. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून  एकुण 28 संघांनी सहभाग नोंदविला. या सर्व संघांमधुन उत्कृष्ट खेळ करणार्‍या  खेळाडूंना निवडून राष्ट्रीय  स्पर्धांसाठी संपुर्ण महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. यात संजीवनीच्या ओम अडसुरेची निवड झाली आहे. या 41 व्या राष्ट्रीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धा दिवाळीनंतर आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथे होणार आहे. ओमला आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक  प्रा. अक्षय येवले यांचे मार्गदर्शन लाभले.

            तसेच महाराष्ट्र  राज्य टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन व अहमदनगर जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी  येथे राज्यस्तरीय टेनिसबॉल व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात अहमदनगर जिल्ह्यााच्या संघात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या हर्षल  राजु जेजुरकर, प्रसाद अरूण निर्मळ, करण आण्णासाहेब माताडे, स्वरूप मच्छिंद्र शेलार व सार्थक प्रविण बागडे या खेळाडूंचा समावेश  होता. या स्पर्धांसाठी महाराष्ट्रातील  विविध जिल्ह्यांमधून 22 संघांनी सहभाग नोंदविला. या 22 संघांमधुन उत्कृष्ट  खेळ करणार्‍या खेळाडूंमधुन महाराष्ट्राचा  संघ तयार करण्यात आला, यात संजीवनीच्या हर्षल जेजुरकरची निवड झाली. हर्षलला क्रीडा प्रशिक्षक  प्रा. शिवराज  पाळणे व प्रा. अक्षय येवले यांचे मार्गदर्शन  लाभले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्‍वस्त  सुमित कोल्हे यांनी ओम, हर्षल, प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे, प्रा. येवले व प्रा.पाळणे यांचे अभिनंदन केले असून ओम आणि हर्षलला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS