मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Homeताज्या बातम्या

मुक्ताईनगर जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही मात्र घटनेत ट्रकचा चक्काचूर झाला

जळगाव प्रतिनिधी- जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर(Muktainagar) जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यावेळी झालेल्

दुचाकी स्वार गाडी स्लिप होऊन पडला ड्रेनेज मध्ये .
मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू
स्कार्पिओ पलटी होऊन शिरली चहाच्या दुकानात (Video)

जळगाव प्रतिनिधी- जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर(Muktainagar) जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. यावेळी झालेल्या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद ते सुरतला जाणाऱ्या ट्रकचा मुक्ताईनगरच्या हडताळा नजीक अपघात झाला. हा अपघात ट्रक समोर मध्यरात्री वन्य प्राणी आल्याने त्याला वाचवताना झाला. यावेळी ट्रक पुलाला धडकला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रकची केबिन पुलाखाली कोसळली. मात्र सुदैवाने अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या घटनेत ट्रकचा चक्काचूर झाला आहे.

COMMENTS