Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून 14 विमानांचे उड्डाणे रद्द

प्रवाशांचे प्रचंड हाल खराब हवामानाचा फटका

पुणे ः प्रतिकूल खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरून हैदराबाद, अमृतसर, गोवा, दिल्ली, लखनऊ या ठिकाणांसाठी होणारी 14 विमान उड्डाणे गुरूवारी अचानक रद्

कसबे सुकेणे शिवारात बिबट्या जेरबंद
कोपरगावमध्ये बालिका दिनानिमित्त कपड्यांचे वाटप
‘ये आझादी झुठी है’ चा नारा आजही खरा वाटतो ः अ‍ॅड.नितीन पोळ

पुणे ः प्रतिकूल खराब हवामानामुळे पुणे विमानतळावरून हैदराबाद, अमृतसर, गोवा, दिल्ली, लखनऊ या ठिकाणांसाठी होणारी 14 विमान उड्डाणे गुरूवारी अचानक रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. देशातील वातावरणामध्ये मागील काही दिवसांपासून वाढत्या प्रदूषणामुळे सातत्याने बदल होत आहेत. परिणामी त्याचा फटका विमान सेवेसह देशभरातील प्रवाशी वाहतुकीला बसत आहे.
मागील काही दिवसांपासून पुण्यातून बाहेरील राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द होत असून, पुणे विमानतळावर ये-जा करणारी विमाने देखील रद्द केली जात आहेत. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. त्यांची नियोजित कामे विमानसेवा रद्द झाल्यामुळे उशिराने होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशाच्या दक्षिणभागात आलेल्या मिचाँग वादळामुळे दक्षिण भागात होणारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा खराब हवामानाचा फटका बसल्यामुळे 14 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशाकडील 90 हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत कोडिराम झोरे (वय 41, रा. गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. झोरे बाहेरगावी निघाले होते. एसटी स्थानकात गर्दी होती. बसमध्ये प्रवेश करत असताना झोरे यांच्या गळ्यातील 90 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून स्वारगेट परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एसटी, तसेच पीएमपी प्रवाशांकडील दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

COMMENTS