Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मलकापूर अर्बन बँकेचा परवाना रद्द

आर्थिक दिवाळे निघाल्याने रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंंबई- विदर्भातील एका मोठ्या बँकांपैकी असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी
पुणे विभागातील 6 लाख 50 हजार 743 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुण्यात मनसेला धक्का 400 कार्यकर्त्यांनी सोडला पक्ष

मुंंबई- विदर्भातील एका मोठ्या बँकांपैकी असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. बुधवारी दिवस संपल्यानंतर आरबीआयने मलकापूर बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, सोबतच बँक ठेवीदारांचे पैसे परत करु शकत नसल्याने आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी बँकेची आर्थिक स्थिती खालवल्याने आरबीआयनं निर्बंध आणले होते. या बँकेच्या परिस्थितीत सुधार करण्यासाठी आरबीआयने वेळ दिला होता. मात्र मागील दीड ते पावणे दोन वर्षात परिस्थिती न सुधारल्याने परवाना रद्द करण्याची वेळ आली. बँकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने आरबीआयने 24 नोव्हेंबर 2021 रोजी बँकेवर निर्बंध लादले होते. त्यावेळी ग्राहकांना खात्यातून दहा हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली होती. सेव्हिंग आणि करन्ट खात्यांसाठी निर्णय लागू करण्यात आला होता. रिझर्व बँकेकडून या बँकेवर सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. नंतर, मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बँक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही.  कोणतीही गुंतवणूक नाही करणार, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही असे निर्बंध टाकण्यात आले होते. बँक कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले होते. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही विदर्भातील मोठ्या बँकेपैकी एक बँक आहे. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर मिळून एकूण 28 ब्रँच आहेत. एक हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बँक आहे. अधिकचे लोन दिल्याने बँकेची आर्थिक स्थिती खराब होत होती. अशात आणखी स्थिती खराब होऊ बँक बुडू नये यासाठी आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये ग्राहकांचे केवायसी नॉर्म्समध्ये गडबड आढळल्याने बँकेला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. विदर्भातील एका मोठ्या बँकांपैकी असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. बुधवारी दिवस संपल्यानंतर आरबीआयने मलकापूर बँकेला बँकिंग व्यवसाय बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबत सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही, सोबतच बँक ठेवीदारांचे पैसे परत करु शकत नसल्याने आरबीआयने मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला आहे. 24 नोव्हेंबर 2021 रोजी बँकेची आर्थिक स्थिती खालवल्याने आरबीआयनं निर्बंध आणले होते. या बँकेच्या परिस्थितीत सुधार करण्यासाठी आरबीआयने वेळ दिला होता. मात्र मागील दीड ते पावणे दोन वर्षात परिस्थिती न सुधारल्याने परवाना रद्द करण्याची वेळ आली. बँकेची आर्थिक स्थिती खराब होत असल्याने आरबीआयने 24 नोव्हेंबर 2021 रोजी बँकेवर निर्बंध लादले होते. त्यावेळी ग्राहकांना खात्यातून दहा हजारांहून अधिकची रक्कम काढण्यास मनाई करण्यात आली होती. सेव्हिंग आणि करन्ट खात्यांसाठी निर्णय लागू करण्यात आला होता. रिझर्व बँकेकडून या बँकेवर सहा महिन्यांपर्यंत निर्बंध घालण्यात आले होते. नंतर, मे महिन्यात पुन्हा ऑगस्टपर्यंत निर्बंध वाढवले होते. आरबीआयच्या पूर्व मंजुरीशिवाय बँक कोणतेही लोन रिन्यू करणार नाही.  कोणतीही गुंतवणूक नाही करणार, कोणाकडूनही उधार घेणे किंवा नवीन ठेवी स्विकारणार नाही असे निर्बंध टाकण्यात आले होते. बँक कोणतीही मालमत्ता विकण्यासही निर्बंध घालण्यात आले होते. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ही विदर्भातील मोठ्या बँकेपैकी एक बँक आहे. मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मलकापूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, वर्धा, अकोला, जळगाव, भुसावळ, मेहकर, चिखली, भोकरदन, सिल्लोड, मूर्तिजापूर मिळून एकूण 28 ब्रँच आहेत. एक हजार कोटींच्या वर ठेवी असलेली ही बँक आहे. अधिकचे लोन दिल्याने बँकेची आर्थिक स्थिती खराब होत होती. अशात आणखी स्थिती खराब होऊ बँक बुडू नये यासाठी आरबीआयकडून निर्बंध घालण्यात आले होते. ऑगस्ट 2021 मध्ये ग्राहकांचे केवायसी नॉर्म्समध्ये गडबड आढळल्याने बँकेला दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

COMMENTS