घंटागाडी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घंटागाडी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शिवसेनेच्या जाधव यांच्या याचिकेवर निकाल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने घंटागाडीचा ठेका दिलेल्या स्वयंभु ट्रान्सपोर्टविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करून चौ

कोकमठाण मध्ये समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रेक्षपण
सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दहा कोटीं रुपयांचा निधी मंजूर
शिवजयंती मिरवणुकीत डीजे दणदणाट…चार गुन्हे दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरातील कचरा संकलन व वाहतुकीसाठी महापालिकेने घंटागाडीचा ठेका दिलेल्या स्वयंभु ट्रान्सपोर्टविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला आहे.
कोरोना काळात घंटा गाड्यांद्वारे केलेल्या कचरा संकलनाची वाढीव बिले स्वयंभु ट्रान्सपोर्टने दिल्याची तक्रार गिरीश जाधव यांनी महापालिकेकडे केली होती. महापालिकेने यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर जाधव यांनी पुन्हा जिल्हा न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. स्वयंभु ट्रान्सपोर्ट, तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी संगनमताने खोटी बिले सादर करून महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. त्यावर जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी निकाल दिला आहे.
स्वयंभु ट्रान्सपोर्टने बिले सादर करताना दुचाकी वाहनांचे नंबर असलेल्या गाड्यांची बिले दिलेली होती, असा दावा जाधव यांनी केला होता. याबाबत पुरावेही त्यांनी सादर केले होते. या आधारावर न्यायालयाने स्वयंभु ट्रान्सपोर्टविरोधात पोलिस ठाण्यात कलम 420, 467, 468 अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तत्कालीन आयुक्त मायकलवार व डॉ. बोरगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शासनाची परवानगी आवश्यक असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. तो ग्राह्य धरण्यात आल्यामुळे या दोघांबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी दिलेला निकाल जिल्हा न्यायाधीश यांनी कायम ठेवला आहे. जाधव यांच्यावतीने अ‍ॅड. अभिजित पुप्पाल यांनी काम पाहिले.

सन 2019 पासून आजतागायत अशाच प्रकारे चुकीची व बोगस बिले दाखवून महापालिकेची फसवणूक केली जात आहे. अधिकार्‍यांच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही. त्यामुळे तत्कालीन अधिकार्‍यांसह आत्ताच्या अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
गिरीश जाधव, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना

COMMENTS