Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांबोरी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना…

खून झाल्याचे निष्पन्न, पोलिसांची पाच शोध पथके झाली कार्यरत

अहमदनगर/प्रतिनिधी ः शेंडी (ता. नगर) शिवारातील वांबोरी फाटा परिसरात शनिवारी (दि. 7 जानेवारी) एका अनोळखी युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला

मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची नवोदयसाठी निवड
अंत्यसंस्कारानंतर दहा दिवसांनी परतला तरुण!
मी कधीही पक्षीय राजकारण केले नाही :-माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड

अहमदनगर/प्रतिनिधी ः शेंडी (ता. नगर) शिवारातील वांबोरी फाटा परिसरात शनिवारी (दि. 7 जानेवारी) एका अनोळखी युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देल्याचे समोर आले आहे. या युवकाची अद्याप ओळख पटली नसून, पोलिसांची पाच शोध पथके त्याची ओळख पटवण्यासह त्याच्या खुन्यांचा शोध घेत आहेत.

या अनोळखी युवकाच्या खून प्रकरणी शनिवारी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार रमेश थोरवे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी वांबोरी फाटा परिसरातील बाळासाहेब गणपत मिस्कीन यांच्या शेत गट नं. 474 मध्ये एका बॅगमध्ये 18 वर्षीय युवकाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या नागरिकांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर या युवकाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवक हा अनोळखी असून त्याची ओळख पटवून त्याचे खुनी शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मृत युवकाची ओळख पटवून त्याचे खुनी शोधण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन तर एमआयडीसी पोलिसांची दोन पथके काम करीत आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसह शेजारील जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतील हरवलेल्या युवकांविषयी माहिती घेतली जात आहे. युवकाची ओळख पटल्यानंतरच त्याच्या खुनीपर्यंत पोहोचता येईल असे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS