Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारचे खासदार श्रीनिवास पाटील कोरोना पॉझिटिव्ह

सातारा / प्रतिनिधी : सिक्कीमचे माजी राज्यपाल सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर

काँग्रेसचे शाश्‍वत विचारच देशाला तारणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व निवडणुका महाडिकांसोबत लढणार : वैभव नायकवडी

सातारा / प्रतिनिधी : सिक्कीमचे माजी राज्यपाल सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर कराड येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेत कोरोना चाचणी करावी, असे आवाहन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले आहे. दरम्यान, खा. श्रीनिवास पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात सातारा, कराड पुन्हा हॉटस्पॉट
कोरोना संसर्गाचा वेग जिल्ह्यात वाढू लागला आहे. यामध्ये सातारा व कराड तालुक्यात सर्वाधिक बाधित असून यापूर्वीच्या दोन्ही लाटांमध्ये हेच तालुके हॉटस्पॉट ठरले होते. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणार्यांची संख्या व ऑक्सिजनची मागणी कमी असल्याने सध्या आरोग्य यंत्रणेवर ताण जाणवत नाही.
सातारा जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना जिल्ह्यात सातारा, कराड पुन्हा हॉटस्पॉट लाटांच्या तुलनेत या लाटेत रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे सापडत आहेत. संसर्गाचा वेग 30 टक्क्यांच्या घरात गेला आहे. त्यामुळे धोका कायम आहे. जिल्ह्यात कराड व सातारा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. सातार्‍यात बुधवारी 405 तर कराडमध्ये 313 रुग्ण बाधित आढळले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या ही ग्रामीण भागात आहे. या सर्व रुग्णांवर लक्षणेनिहाय गृहविलगीकरणात डॉक्टर उपचार करत आहेत. अशा रुग्णांची माहिती आरोग्य विभाग घेत आहे.

COMMENTS