Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माण तालुक्यात नवजात अर्भकास फेकून दिल्याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल

म्हसवड / वार्ताहर : रांजणी, ता. माण येथील महिलेने तिच्या पोटी पाच दिवसांपुर्वी जन्मलेले नवजात अर्भक ज्वारीच्या पिकात टाकुन गुपचुपपणे विल्हेवाट लावल्य

जयवंतराव भोसले पतसंस्थेची 395 कोटींची व्यवसायपूर्ती : डॉ. अतुल भोसले
सोने तारण कर्जात बँक ऑफ इंडियाला लावला चुना
इस्लामपुरात राज्यपाल कोश्यारींच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने निषेध

म्हसवड / वार्ताहर : रांजणी, ता. माण येथील महिलेने तिच्या पोटी पाच दिवसांपुर्वी जन्मलेले नवजात अर्भक ज्वारीच्या पिकात टाकुन गुपचुपपणे विल्हेवाट लावल्या प्रकरणी संबंधित महिला मनिषा शरद ढवळे हिच्या विरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी, पांडुरंग लक्ष्मण खाडे (वय 56, पोलीस पाटील, रा. रांजणी, ता. माण) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात हजर राहून महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आप्पा दगडु ढवळे यांचे शेतातील ज्वारीचे पिकात एक नवजात पुरूष जातिचे मृत अवस्थेत असलेले अर्भक कुत्र्याने ओढुन आणुन शेतात टाकले आहे. अशी माहिती शिंगु रामहारी दोलताडे (रा. रांजणी, ता. माण) याने रांजणीचे पोलीस पाटील पांडुरंग लक्ष्मण खाडे यांना फोनवरून दिली. तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता पुरूष जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आले. याबाबत मी त्या शेताचे शेजारी असले घरात या अर्भकाबाबत विचारपुस करताना मनिषा शरद ढवळे हिने तिला गेले 6 महिने पाळी आली नव्हती. तसेच गेल्या पाच दिवसापूर्वी माझ्या अचानक अंगावरील जावुन रक्तस्वात होऊ लागल्याने नवजात अर्भक मृत जन्माला आले होते. त्यामुळे तिने हे नवजात अर्भक पाच दिवसापुर्वी ज्वारीच्या पिकात टाकल्याचे सांगितले. मनिषा शरद ढवळे हिने तिच्या मृत अर्भकाची कोणालाही माहिती न देता गुपचुपपणे विल्हेवाट लावली. तसेच अर्भक जन्मल्याची महिती लपवून ठेवल्याचे माझ्या लक्षात आल्याने या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुध्द तक्रार दाखल केली असून पुढील तपास सपोनि बाजीराव ढेकळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार देवा खाडे करत आहेत.

COMMENTS