Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात ढग आले दाटून; पावसाविना गेले फिरून !

लातूर प्रतिनिधी - जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत अस

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन
बिग बॉस’ फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल
उध्दव महाराजांनी वडुलेचे नाव राज्यात पोहचवले

लातूर प्रतिनिधी – जिल्ह्यात तीन आठवड्यांपासून वरुणराजाने उघडीप दिली आहे. दोन दिवसांपूर्वी निघालेल्या मघा नक्षत्रामुळे ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा वाढल्या असून खरीप पिकांसाठी पावसाची नितांत गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 323.9 मिमी पाऊस झाला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत 205.4 मिमी पावसाची तूट आहे.
जिल्ह्यात यंदा विलंबाने पावसाला सुरुवात झाली. मृग कोरडा गेल्याने खरीप पेरणीस उशीर झाला. जून अखेरीस पासून काही ठिकाणी पेरणीस सुरुवात झाली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरिपाच्या पेरण्या सुुरू होत्या. वेळेवर पावसाची बरसात न झाल्याने जिल्ह्यात उडीद, मूग आणि तुरीच्या पेर्‍याच्या क्षेत्रात घट झाली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, सतत रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे आंतर मशागतीची कामे खोळंबली होती. परिणामी, पिकांत तण वाढले होते. जुलैअखेरपासून बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने पिकांतील मशागतीच्या कामांना वेग आला होता. शेतकरी तण नष्ट करण्यासाठी तणनाशकांची फवारणी करीत होते. तद्नंतर जवळपास तीन आठवड्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मध्यंतरी पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन जोमात उगवले. त्यानंतर आंतरमशागतीच्या कामांना वेग आला होता. सध्या सोयाबीन हे फुलोर्‍याच्या अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनसह अन्य पिकांना पावसाची गरज आहे. परंतु, पावसाने उघडीप दिल्याने हलक्या रानावरील पिके दुपार धरू लागली आहेत. दरम्यान, गुरुवारपासून मघा नक्षत्रास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पात सध्या 20 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. लघु पाटबंधारेच्या 134 प्रकल्पात 23 टक्के तर 27 बॅरेजेसमध्ये 33 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. प्रकल्पातील जलसाठा वाढण्यासाठी तसेच पिकांसाठी पावसाची गरज आहे. जिल्ह्यात एकूण 8 मध्यम प्रकल्प असून त्यावर विविध गावांच्या जल योजना आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही सातत्याने दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नाही. व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा अद्यापही झाला नाही. तावरजा प्रकल्पात केवळ 2 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत मध्यम प्रकल्पात 83 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. सध्या केवळ 20 टक्के आहे.

COMMENTS