सांगली : सांगली शहरातील राम मंदिर चौकात शनिवारी पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत

सांगली : सांगली शहरातील राम मंदिर चौकात शनिवारी पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत बसवण्यात येणार होता. पण तत्पूर्वीच तो राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून काढला.यासंबंधीच्या माहितीनुसार, शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार होते. त्याचे भूमिपूजन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार होते. पण तत्पूर्वीच 60-70 जणांनी एकत्रित येऊन शनिवारी पहाटे 4.30 वा. हा पुतळा राम मंदिर चौकातील चबुतर्यावर उभारला.

COMMENTS