Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई शक्ती स्कुलमध्ये विविध कार्यक्रम 

कोपरगाव शहर :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल कासलीमध्ये संस्थापक

यशासाठी कठोर परीश्रमाची ठेवा तयारी : डॉ. कोल्हे
संजीवनी एआय नेक्सस हेकॅथॉन स्पेर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद एआय क्षेत्रातील नवोन्मेशक कल्पनांना चालना देण्यासाठीचा उपक्रम
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

कोपरगाव शहर :  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल कासलीमध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. परशराम साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर भाषण दिली तर सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ तसेच स्वराज्यातील मावळ्यांची वेशभूषा करत वेगवेगळे कार्यक्रम सादर करत शिवरायांचा जीवनपट समोर मांडला. सदर जयंती सोहळा यशस्वी होण्यासाठी सुशांत साबळे,सोनाली कापसे,आयुब शेख, अलका जाधव आदींनी अथक परिश्रम घेतले तर संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे यांनी सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

COMMENTS