Solapur : भेसळयुक्त दुधाच्या साठ्यावर अन्न सुरक्षाची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : भेसळयुक्त दुधाच्या साठ्यावर अन्न सुरक्षाची कारवाई

सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यातील देवळे येथे दूध भेसळीच्या गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्या

पंतप्रधान जी-20 शिखर परिषदेसाठी रवाना
संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात
नांदेडमध्ये पुन्हा 11 रुग्णांचा मृत्यू

सोलापूर जिल्हातील सांगोला तालुक्यातील देवळे येथे दूध भेसळीच्या गुप्त माहितीवरून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांच्या समवेत देवळे येथील रणजित शिवाजी व्हनमाने यांच्या मालकिच्या मे. विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स, अलदार वस्ती, या ठिकाणी पेढीवर धाड टाकून तपासणी करण्यात आली.

या तपासणी दरम्यान पेढीमध्ये दुध भेसळीकरीता लिना निळ या कंपनीच्या 500ml चे 10 सील बंद बॉटल आढळून आल्या.

तसेच पेढीच्या बाजूंला असलेल्या युवराज भगवान अलदार यांच्या घराची तपासणी केली. त्याठिकाणी एका खोलीमध्ये व्हे पावडर अमूल ब्रॅण्डचे 25 किलो चे 3 बॅग आढळून आल्या. या ठिकाणी लिना निळ बाबत रणजित शिवाजी व्हनमाने  यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर निळ ही गाईच्या  दूधामध्ये टाकून गायीच्या दुधास म्हशीच्या दुधासारखा पांढरा रंग करण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. यावरुन मे.विठाई मिल्क & फूड प्रॉडक्ट्स  या पेढीमार्फत भेसळयुक्त दुधाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्यानंतर या ठिकाणाहून गाय दुध या अन्न पदार्थाचे तसेच व्हे पावडर व लिना निळ या अपमिश्रकाचे नमुने विश्लेषणास घेऊन उर्वरित  साठा जप्त करण्यात आलेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=CIQm_eLnLzo

COMMENTS