Homeताज्या बातम्याछ. संभाजीनगर

ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या कादंबरीला ‘कला गंगा’ पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला-गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार -2025 सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी म्हणून ऋषिकेश गोल्हार यांच्या

छ.संभाजीनगरमध्ये तरूणीची भरदिवसा हत्या
निदा खानला 11 मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडीछत्रपती संभाजीनगरमधून अटक ; तपासाला येणार वेग
मराठवाड्यात ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा : अंबादास दानवे


छत्रपती संभाजीनगर : लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला-गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार -2025 सर्वोत्तम ग्रामीण कादंबरी म्हणून ऋषिकेश गोल्हार यांच्या ‘रानोबाचा माळ’ या ग्रामीण कादंबरीची निवडण्यात आली आहे.
यावर्षी या पुरस्कार योजनेसाठी एक जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान प्रकाशित झालेल्या नवोदित ग्रामीण लेखकांच्या एकूण 14 कादंबर्या प्राप्त झाल्या होत्या. या कादंबर्यांचे परीक्षण ग्रामीण कादंबरीकार, कथाकार बाबाराव मुसळे, ज्येष्ठ कवी, समीक्षक मोहन शिरसाट आणि नामावंत वाचक प्राचार्य भास्कर गायकवाड या तिघांनी केले. सन्मानचिन्ह आणि दहा हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही पुरस्कार योजना गतवर्षीपासून नवोदित ग्रामीण कादंबरीकारांसाठी सुरू करण्यात आली असून, यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम सहा जून 2026 रोजी सायंकाळी सहा वाजता वत्सगुल्म फाउंडेशन वाशीम, विदर्भ साहित्य संघ शाखा वाशीम, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशीम आणि मुसळे कुटुंबियांतर्फे पार पडणार आहे.‘रानोबाचा माळ’ ही कादंबरी शब्दवेध बुक हाऊस, या प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. ऋषिकेश गोल्हार यांची ‘रानोबाचा माळ’ ही कादंबरी आजच्या बदलत्या ग्रामीण जीवनाला कवेत घेणारी आहे. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांच्या वाट्याला आलेलं खडतर जगणं सुसह्य करण्यासाठी त्यांना कधीकधी विस्थापित व्हावे लागते, हे सूत्र सांगते.

COMMENTS