Homeताज्या बातम्या

सावित्रीबाई फुले यांच्यावरील मालिका पुन्हा सुरू करा : मंडलिक  

अकोले : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका बंद करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ती पूर

कै. पिचड यांचे जलव्यवस्थापनातील योगदान उल्लेखनीय : डॉ. शिंदे
अकोले तालुक्यात जनगणनेसाठी प्रशासन सज्ज४५८ प्रगणक व ६९ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण; डिजिटल पद्धतीने जनगणना
संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड


अकोले : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिका बंद करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त करत ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेना अकोले तालुका कार्याध्यक्ष तथा अकोले नगरपंचायतीचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केली आहे.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मंडलिक यांनी म्हटले आहे की, एका मराठी वाहिनीवर जानेवारी २०२६ पासून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित मालिका प्रसारित होत होती. मात्र अवघ्या पाच महिन्यांत ही मालिका बंद करण्यात आली. समाजप्रबोधन करणारी आणि स्त्री शिक्षणाचा संदेश देणारी मालिका बंद करणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच कौटुंबिक कलह आणि विकृत प्रवृत्ती दाखविणाऱ्या मालिका सुरू राहतात; मात्र समाजसुधारकांच्या जीवनावर आधारित मालिका टिकत नाहीत, ही खेदजनक बाब असल्याचे मंडलिक यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीस एकल महिला पुनर्वसन समितीच्या प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, बबनराव तिकांडे, मच्छिंद्र मंडलिक, शेटे महाराज, मनोहर मालुंजकर, अनिल कोळपकर, संतोष मुर्तडक, स्वप्नील शहा आदींनी पाठिंबा दिला. तहसीलदारांना निवेदन सादर करताना संबंधित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
\\\\\\\\\\\\\\

COMMENTS