Homeताज्या बातम्यादेश

हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा ?

हिमाचल प्रदेश - राज्यसभा निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हिमाचल प्रदेशची सध्या देशभर चर्चा चालू आहे. राज्यात मंगळवारपासून मोठं राजकीय ना

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक
शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर ; आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण
‘टेम्पल ऑफ जस्टिस’ की, …

हिमाचल प्रदेश – राज्यसभा निवडणुकीत झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे हिमाचल प्रदेशची सध्या देशभर चर्चा चालू आहे. राज्यात मंगळवारपासून मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपाच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता. परंतु, तरीही भाजपाच्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याने काँग्रेसचा पराभव झाला. परिणामी हिमाचल प्रदेशमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर, दुसरीकडे भाजपाने राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली आहे. त्याचबरोबर, भाजपा आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने १५ भाजपा आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. गेल्या २४ तासांत राज्यात या तीन घडामोडी घडल्या आहेत. त्यापाठोपाठ विरोधकांनी आणखी एक दावा करत मोठा राजकीय स्फोट केला आहे.

हिमाचलचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दावा केला की, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी राजीनामा सादर केला आहे. राज्याच्या राजकारणात चालू असलेली उलथापालथ पाहून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाल्यानंतर स्वतः सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या सर्व वृत्तांचं आणि दाव्यांचं खंडण केलं आहे.

COMMENTS