लव्ह जिहादचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ऑनलाइन व्याख्यान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लव्ह जिहादचे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी ऑनलाइन व्याख्यान

मुंबई : प्रतिनिधी‘लव्ह जिहाद’ हा शब्द मागील काही वर्षांत इतका प्रचलित झाला आहे की, तो जवळजवळ सर्वश्रुत झाला आहे. राज्यघटनेच्या कलम २५ नुसार प्रत्

सात मुलांची आई, 30 वर्षांनी लहान तरुणासह महिला फरार
कल्याणमधील राैनक सिटीतील इमारतीमधील फ्लॅटला लागली आग
बुलडाण्यातील 4 गावांचा मध्यप्रदेशात जाण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी
‘लव्ह जिहाद’ हा शब्द मागील काही वर्षांत इतका प्रचलित झाला आहे की, तो जवळजवळ सर्वश्रुत झाला आहे. राज्यघटनेच्या कलम २५ नुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या मर्जीने कोणताही धर्म स्वीकारण्याची मुभा मिळालेली आहे.

असे असले, तरी हिंदूंचे अस्तित्व नियोजनबद्ध संपवण्याचा कट ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. लव्ह जिहाद ही समस्या अंत्यत संवेदनशील आहे. या षड्यंत्रपासून आपल्याला वाचायचे असेल तर वेळीच जागृत होणे आवश्यक आहे.

यासंबंधी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येत्या रविवार 5 सप्टेंबर या दिवशी रात्री 8 वाजता ‘लव्ह जिहाद- एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विशेष ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

युट्युब या प्रणालीवरील https://youtu.be/LVaNuEzZbZc या लिंकवर हा ऑनलाइन कार्यक्रम सर्वांना पाहता येईल. या कार्यक्रमाला समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट आणि समितीच्या नगर येथील कु. प्रतीक्षा कोरगावकर हे संबोधित करणार आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाधिक बांधवांनी या ऑनलाइन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS