Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारत न्याय यात्रेला होणारा विरोध

भाजपच्या दृष्टीने काँगे्रस गलितगात्र झालेली आहे, भाजपच्या दृष्टीने त्यांना सक्षम विरोधक नाही. असे असतांना देखील, आसाममध्ये भारत न्याय यात्रेला ज्

समानतेच्या दिशेने…
मंदीचे वारे
भ्रष्टाचार आणि तपास यंत्रणा

भाजपच्या दृष्टीने काँगे्रस गलितगात्र झालेली आहे, भाजपच्या दृष्टीने त्यांना सक्षम विरोधक नाही. असे असतांना देखील, आसाममध्ये भारत न्याय यात्रेला ज्यापद्धतीने विरोध होत आहे, त्यादृष्टीने बघितले असता, भाजपला आसाममध्ये भीती वाटत आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. देशामध्ये भाजपने ज्यापद्धतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा हायजॅक केला त्यावरून, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची अर्धी लढाई जिंकल्यागत जमा असतांना, आसाममध्ये हा विरोध करण्यामागचे कारण काय, हा महत्वाचा प्रश्‍न आहे. खरंतर देशभरात सध्या कुणालाही सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर काहीही देणे-घेणे राहिलेले नाही. माध्यमे देखील सरकार जिकडे घेऊन जाईल तिकडेच जातांना दिसून येत आहे. त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्‍न, त्यांच्या रोजच्या जीवन-मरणाशी संघषर्र् समजून घेण्याचा वेळ नाही. मात्र हा संघर्ष राहुल गांधी जनतेसमोर मांडतांना दिसून येत आहे, त्यामुळेच त्यांना हा विरोध होत असावा.  

खरंतर भारत जोडो यात्रेनंतर पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत तेलंगणा वगळता काँगे्रसला यश मिळालेले नाही. शिवाय काँगे्रसची सत्ता असलेले छत्तीसगड आणि राजस्थान दोन राज्ये त्यांनी गमावलेले असतांना देखील, आसाम राज्यात या यात्रेला होणारा विरोध बघता कुठेतरी आसाम राज्यातील भाजपच्या मनात शंका असल्याचे दिसून येत आहे. खरंतर देशभरात 22 जानेवारी रोजी श्रीराम उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत असतांना, आणि या उत्सवाचे राजकियीकरण करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. आसाममध्ये होणारा विरोध हा अनाकलनीय असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता भाजपने आपली लढाई वेगळ्याच पातळ्यांवर लढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप वैचारिक विरोध करणे शक्य नाही. अशावेळी भाजपकडून होणारा विरोध हा वेगळ्याच पातळीवरचा आहे. यातून अनेक बोध होतांना दिसून येत आहे. भाजप काँगे्रसला चूक करण्यासाठी मजबूर करत आहे. मात्र काँगे्रसने शांततेच्या मार्गानेच आंदोलन करायला हवे. दोन दिवसांपूर्वीच काँगे्रस नेते जयराम नरेश यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे दिसून येत होते. वास्तविक पाहता आसामसारख्या राज्यात काँगे्रसला होणारा विरोध का आहे, यामागची कारणे समजून घेण्याची गरज आहे. आसाममध्ये भाजपचे राज्य आहे. आणि या राज्यात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच भारत न्याय यात्रा या राज्यातून लवकर गुंडाळण्यासाठी प्रयत्न होतांना दिसून येत आहे. 22 जानेवारी रोजी राहुल गांधी आसाममधील नागाव येथे पोहोचले. बोर्डी पोलीस ठाण्यातील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी ते येथे आले होते, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सुरक्षा दलांनी राहुल आणि इतर काँग्रेस नेत्यांना हैबरगाव येथे अडवले. येथे सुरक्षा दलांशी वाद झाल्यानंतर राहुल आणि इतर काँग्रेस नेते संपावर बसले. येथुन आसाम सरकार आणि राहुल गांधींमध्ये संघर्षाला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत न्याय यात्रा मणिपूर राज्यापासून ते मुंबईपर्यंत काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरूवातच 14 जानेवारीपासून झाली आहे. सुरूवातीला मणिपूर राज्याचा असलेला विरोध मावळल्यानंतर भाजपशासित राज्य असलेल्या आसाममध्ये या यात्रेला ज्यापद्धतीने अडवले जात आहे, त्यादृष्टीने विचार करता, आसाममध्ये भाजपला मोठी भीती वाटत असल्याचे दिसून येत आहे. आसाम राज्यामध्ये भारत न्याय यात्रा 25 जानेवारी पर्यंत असणार आहे. मात्र या तीन दिवसांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष या यात्रेला सहन करावा लागत आहे. याचसोबत त्यांना शहरातून जाण्यास विरोध करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.  

COMMENTS