Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था

सातारा / प्रतिनिधी : खिरखिंडी, ता. जावली येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास, ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्

आयटी पार्क खोटच आहे म्हणूनच आमदारांनी किरण काळें समोर खुल्या चर्चेला येण्यापासून पळ काढला
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पात मोठा घोटाळा; मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर शेलारांचा गंभीर आरोप
पांचगणी पालिका मुख्याधिकार्‍यांच्या अंगावर काळा रंग टाकून हल्ला

सातारा / प्रतिनिधी : खिरखिंडी, ता. जावली येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास, ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
राज्यातील विविध प्रसार माध्यमात प्रकाशित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली असून प्रत्यक्ष वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे :- जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी, ता. जावली येथील हायस्कूलमध्ये जावे लागते.
सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल, सागाव या ठिकाणी वन विभागाने केले आहे. त्यासाठी 242 हेक्टर जमिन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमिन ताब्यात घेतली नाही. ते एकसाल, सागाव या गावी जावून जमिन ताब्यात न घेता परत आले आहेत. तसेच 1 कुटुंबांने जमिन ताब्यात घेतली असून ते परत खिरखिंडी येथे वास्तव्यास आले आहे. अशी एकूण 7 कुटुंबातील 25 लोक खिरखिंडी येथे राहतात. त्याच कुटुंबातील एकूण 8 मुले (4 मुले व 4 मुली) अंधारी येथील हायस्कूलला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात.
त्यासाठी मौजे खिरखिंडी गावातील 4 मुले व 4 मुली यांना घरापासून ते कोयना जलाशय किनार्‍यापर्यंत येण्यासाठी 10 मिनिटे लागतात. तेथून पुढे कोयना जलाशय ते शेंबडी मठ जलाशयातील 600 मीटर प्रवास बोटीने करावा लागतो. तेथून पुढे अंधारी येथील हायस्कूलला फळणी मार्गे पायी जाण्यासाठी साधारणत: एक तास इतका वेळ लागतो.
मौजे अंधारी, ता. जावली येथील हायस्कूल हे अनिवासी हायस्कूल आहे. तथापी मौजे अंधारी येथे कसाईदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अंधारी-कास ही निवासी आश्रमशाळा आहे. तेथे या विद्यार्थ्यांची निवासाची सोय होऊ शकते. तरीही हे विद्यार्थी निवासी राहत नाहीत. ते घरुनच येऊन-जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्यांना लाईफ जॅकेट पुरविण्यात आली आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी फायबर बोटीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

COMMENTS