Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईडी, सीबीआयच्या कचाट्यात येण्यास वेळ लागणार नाही !

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा कडक शब्दात अधिकार्‍यांना इशारा

औरंगाबाद / प्रतिनिधी ः जिल्हा परिषद अंतर्गत सुरु असलेल्या कामांमध्ये अधिकारी, कर्मचारी पैशाशिवाय काम करत नाही. प्रत्येक कामांमध्ये पैसे मागितले ज

बोगस वियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा
अब्दुल सत्तार यांच्या बॉलींगवर खासदार इम्तियाज जलील ‘क्लीन बोल्ड’
चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली  

औरंगाबाद / प्रतिनिधी ः जिल्हा परिषद अंतर्गत सुरु असलेल्या कामांमध्ये अधिकारी, कर्मचारी पैशाशिवाय काम करत नाही. प्रत्येक कामांमध्ये पैसे मागितले जात आहे. प्रशासनावर वरिष्ठांचा वचक उरला लागणार नाही…’ अशा कडक शब्दात धमकी वजा इशाराच राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली.
मोठे-मोठे लोक इडी, सीबीआय, बांधकाम, वित्त अनुभव आहे. आजही परत एकदा एसीबीमध्ये अडकत आहे. तुम्हाला वेळ विभाग टार्गेटवर जिल्हा सिल्लोड सोयगाव मतदार संघातील सिल्लोड, सोयगाव पंचायत समिती अंतर्गत असणार्‍या विकास कामाची आढावा बैठक कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात (19) रोजी घेतली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना अब्दुल समीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, वित्त व लेखा अधिकारी चंद्रकांत पाटील, कार्यकारी अभियंता बांधकाम सुनील ठाकरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख सिल्लोड सोयगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभाग आणि वित्त विभागाला मंत्री सत्तार यांनी चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.
मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमीच अधिकार्‍यांना धारेवर धरतात असा आतापर्यंतचा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना त्याचा प्रयत्य आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या कंत्राटांमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या अधिकार्‍यांनी टक्केवारीची मागणी केली होती. यासाठी त्यांचा कंत्राट देखील त्रुटी काढत थांबवण्यात आला होता. यावरून यापूर्वी देखील संबंधित कंत्राटदाराने वाद घातला होता. यासोबतच वित्त विभागात देखील बिले काढण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येते. टक्केवारी न दिल्यास बिले काढण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. वारंवार सूचना देऊनही बदल न झाल्यानेच ही बैठक घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कान उघडणीनंतर अधिकारीही अवाक झाले. अधिकारी, कर्मचारी पुढे काय भूमिका घेतात , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS