Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच

सरकारने मागितला आणखी वेळ ; आंदोलक उपोषणावर ठाम

जामखेड/प्रतिनिधी ःधनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ग

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर
धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    
धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

जामखेड/प्रतिनिधी ःधनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गुरुवारी शिष्टमंडळाची मुंबई येथे चर्चा झाली. या शिष्टमंडळात यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे , राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, प्रदेश उपाध्यक्ष समाधान पाटील, सरचिटणीस नितीन धायगुडे यांचा समावेश होता. मात्र या चर्चेत धनगर आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नसून, सरकारने आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.
या चर्चेत धनगर आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ द्या अशी मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली. पण आंदोलकांनी त्याला विरोध केला. सरकारने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे. आतापर्यंत सरकारने धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर कितीतरी वेळ घेतला, आता आणखी वेळ मागून घेत आहेत. आणखी दोन महिन्यांनंतरही काही होईल असे वाटत नाही. आजच आमच्या मागण्या पूर्ण होईल असं वाटत होते, पण तसे झाले नाही अशी प्रतिक्रिया आंदोलनाच्या शिष्टमंडळाने दिली. धनगर समूदायाला केंद्रात एसटीचा दर्जा असून राज्यात मात्र तो दिला जात नाही असं आंदोलकांच्या वतीनं प्रतिक्रिया देण्यात आली. अहमदनगरच्या चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाला एसटी संवर्गत समाविष्ट करावं या मागणीसाठी  अमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. उपोषणाचा सोळावा दिवस आहे. या आंदोलनाची वाढती आक्रमकता लक्षात घेऊन सरकारने आज मुंबईत बैठक बोलावली होती. मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नाही. अण्णासाहेब रुपनवर आणि सुरेश बंडगर हे उपोषणाला बसलेले आहेत. रुपनवर यांची प्रकृती खालवल्यने 19 तारखेला पुण्याला ससून रुग्णालयात हलवले,त्याआधी त्यांना 15 तारखेला अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांनी 20 तारखेपासून पाणीही देखील सोडले आहे. सरकारच्या वेळकाढू धोरणाविषयी धनगर समाज बांधवांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS