Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कोण होता शिवाजी’ पुस्तकाचे वाचन उपक्रम; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचा पुढाकार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबाबत समाजात योग्य माहिती पोहोचावी आणि जातीय सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्र

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मनोंद असलेलं अप्रकाशित मोडीपत्र उजेडात l DAINIK LOKMNTHAN
शिवराज्याभिषेक हाच भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन: छत्रपती संभाजीराजे महाराजांच्या जयघोषाने गड परिसर दुमदुमला
दुर्गराज रायगडावर 5 व 6 जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा; मोठ्या संख्येने उपस्थित राहा – गंगाधर काळकुटे पाटीलयुवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक उत्सव; हजारो शिवभक्त होणार सहभागी
शिवाजी कोण होता?' हे गोविंद पानसरे यांचं पुस्तक उर्दू भाषकांपर्यंत कसं  पोहोचलं? - BBC News मराठी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबाबत समाजात योग्य माहिती पोहोचावी आणि जातीय सलोखा अबाधित राहावा, या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागातर्फे ‘कोण होता शिवाजी’ या पुस्तकाच्या वाचनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा उपक्रम रविवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ८ ते ९.३० या वेळेत पार पडणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘कोण होता शिवाजी’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही अवमान करण्यात आलेला नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाने केला आहे. अनेक वर्षांपासून हे पुस्तक वाचले जात असताना याबाबत कोणतीही शंका उपस्थित झाली नव्हती. मात्र, अलीकडेच राज्यातील एका मंत्र्याने या पुस्तकावर टीका करत वाद निर्माण केल्याचे शिक्षक विभागाने म्हटले आहे. या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश सोनवणे यांच्या आवाहनानुसार हा वाचन उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक विभागासोबतच काँग्रेस विचारांशी संबंधित इतर इच्छुकांनाही या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रदेश काँग्रेस शिक्षक विभागाचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सचिन दुर्गाडे यांच्याशी मोबाईल क्र. (९९७००६३२७३) वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिक्षक विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पुस्तकाचे वाचन करावे, तसेच मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS