Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोकरीच्या आमिषाने 12 लाखांचा गंडा: दोघांना अटक

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला 12 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बँ

वडिलांच्या मृत्यूनंतर लेकीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
पाथर्डीचे तालुका आरोग्यधिकारी सक्तीच्या रजेवर
आ. राणेंचे नगर लक्ष ठरणार…विखे-जगतापांना अडचणीचे?

इस्लामपूर / प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुलाला नोकरी लावण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला 12 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी बँकेच्या दोघा सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी हणमंत कृष्णा भोई (रा. बोरगाव, ता. वाळवा), धनाजी अण्णा शिंदे (रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, इस्लामपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत आनंदा शंकर घाडगे (रा. बोरगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आनंदा घाडगे यांचे बोरगावमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. जानेवारी महिन्यामध्ये हणमंत भोई यांच्या घरातील फॅब्रिकेशनचे काम सुरू होते. त्यावेळी धनाजी शिंदे तेथे आला होता. हणमंत भोई याने ‘मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत मोठा अधिकारी असून, सध्या बँकेत भरती सुरू आहे. कोणाला नोकरीला लावायचे असल्यास मी लावतो. त्यासाठी 12 ते 15 लाख रुपये द्यावे लागतील, असे घाडगे यांना सांगितले. त्यानंतर घाडगे यांनी मुलगा सत्यम याला बँकेमध्ये क्लार्क म्हणून नोकरी लावण्यासाठी उसनवारीने सहा लाख रुपये जमा केले. 11 जानेवारी रोजी घाडगे यांनी ती 6 लाख रुपयांची रक्कम इस्लामपूर येथे मेहुण्याच्या घरी भोई, शिंदे यांना दिली. त्यानंतर घाडगे यांनी 1 जून रोजी राहिलेली 6 लाख रुपये बोरगाव येथील त्यांच्या वेल्डींगच्या दुकानात भोई, शिंदे यांना दिले. त्यानंतर काही दिवस घाडगे हे मुलाच्या नोकरी मिळेल, या आशेवर गप्प होते.
काही दिवसात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नोकर भरतीची जाहिरात निघाली. बँकेतील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण झाली. मुलाला नोकरी लागत नाही, असे लक्षात आल्यानंतर घाडगे यांनी शिंदे, भोई यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. दोघांनी, ‘तुझ्याकडे काय पुरावा आहे, आम्ही पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर’, अशी धमकी दिली. याप्रकरणी भोई, शिंदे यांच्याविरुध्द फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला लावण्याच्या आमिषाने पुतणीची फसवणूक केल्याप्रकरणी हणमंत भोई आणि त्याचा साथीदार धनाजी शिंदे यांच्यावर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. बँकेमध्ये नोकरी लावण्याच्या आमिषाने भोई, शिंदे यांनी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केले आहे.

COMMENTS