दस्त नोंदणी कार्यालये  आज व उद्या राहणार सुरू  ; शास्ती कमी झाल्याने निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दस्त नोंदणी कार्यालये आज व उद्या राहणार सुरू ; शास्ती कमी झाल्याने निर्णय

अहमदनगर/प्रतिनिधी-डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यांसाठी तर माहे-जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करून ती 1 हजार रुपये इतकी निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे व त्यामुळे दस्त नोंदणी वाढणार असल्याने शनिवारी (26 जून) व रविवारी (27 जून) दस्त नोंदणी सुरु राहणार असल्याची माहिती नगरचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहमदनगरचं नातं | Ambedkar Jayant Special | LokNews24
विस्ताराधिकारी उज्वला गायकवाड यांची पुणे विभागात नियुक्ती
श्रीगोंदा शिवसेना युवासेनेची कार्यकारिणी जाहीर

अहमदनगर/प्रतिनिधी-डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यांसाठी तर माहे-जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करून ती 1 हजार रुपये इतकी निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे व त्यामुळे दस्त नोंदणी वाढणार असल्याने शनिवारी (26 जून) व रविवारी (27 जून) दस्त नोंदणी सुरु राहणार असल्याची माहिती नगरचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी दिली. 

    24 जून 2021 अन्वये कोविड-19 मुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहीत कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 च्या नियम 27 मधील प्रचलित तरतुदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यांसाठी तर माहे-जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादित प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करून ती रुपये 1 हजार इतकी निश्‍चित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त मोठ्या प्रमाणात नोंदणीस दाखल होण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आदेश दिले असून, या निर्णयानुसार त्या प्रकारच्या दस्तांची नोंदणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या सवलतीचा लाभ जनतेला होण्यासाठी या कार्यालयाच्या अधिनस्त सर्व दुय्यम निबंधक कार्यालये दि. 26 व 27 जून 2021 या शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दस्त नोंदणी करण्यासाठी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS