Homeताज्या बातम्या

 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आमदार व खासदारांविरोधात आंदोलन

अमरावती प्रतिनिधी - विदर्भातील प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट देऊन आम्हाला नोकरीमध्ये सम

हिलाल जगदाळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार 
ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी
चांदवड तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या पाच गावातील पाणी स्रोत वागदर्डी धरणातून उपलब्ध करण्याबाबत जिल्हा परिषदेने केली तांत्रिक समिती गठीत

अमरावती प्रतिनिधी – विदर्भातील प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. प्रकल्पग्रस्ताचे सर्टिफिकेट देऊन आम्हाला नोकरीमध्ये समाविष्ट करा या मागणीसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेच्या वतीने मागील आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदाराच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. तरीदेखील अधिवेशनात कुठलाही आमदारांनी प्रकल्पग्रस्ताचा मुद्दा मांडला नाही त्यामुळे आज अमरावतीच्या राजकमल चौकात प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येत ‘आमदार,खासदार जागे व्हा’ अशा घोषणा देत जवाब दो आंदोलन करत आमदार व खासदारांचा निषेध केला.  गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या प्रलंबित आहे मात्र तरी देखील आमदार खासदार मागणीकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला यानंतर जर लोकप्रतिनिधी लक्ष न दिल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिला. 

COMMENTS