Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री

सातारा / प्रतिनिधी : भूसंपादना अभावी रखडलेली कालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच भूसंपादनाचे प्रश्‍न सोडवून जोड कालव

माळशिरस रस्त्यावर मोटारसायकलच्या धडकेत दोन तरूणांचा जागीच मृत्यू
जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द

सातारा / प्रतिनिधी : भूसंपादना अभावी रखडलेली कालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच भूसंपादनाचे प्रश्‍न सोडवून जोड कालव्याची कामे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी पालकमंत्री देसाई यांनी या सूचना दिल्या.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. शशिकांत शिंदे, आ. अनिल बाबर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे त्यांची क्षमता कमी होत असल्याचे सांगून ना. देसाई म्हणाले, हा गाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच मोठे राज्यमार्ग व जिल्हा मार्गांच्या कामांसाठी भराव म्हणून वापरता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवाने द्यावेत. सिंचन विभागाने संबंधित बांधकाम विभागाशी संपर्क साधावा. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना शासन राबवत आहे. त्यामुळे या विषयात अडचण येण्याचे कारण नाही. शंभर टक्के पाणीपट्टी वसूलीच्या दृष्टीने कार्यवाही करावी. सिंचनाखाली येणारी जमीन आणि वसुल होणारी पाणीपट्टी यांची मोजणी करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करून नेमका हिशोब मांडावा, अशा सूचनाही ना. देसाई यांनी दिल्या.
बैठकीत खा. श्रीनिवास पाटील यांनी धरणांमधील गाळ काढण्याबाबत सूचना केली. आ. जयकुमार गोरे आणि आ. शशिकांत शिंदे यांनी उरमोडी धरणाच्या कालव्यातून पाण्याची आवर्तने तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तसेच आ. अनिल बाबर यांनी जोड कालव्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला.
यावेळी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता डोईफोडे यांनी रब्बी हंगामाच्या पाणी वाटपाच्या नियोजनाचे सादरीकरण केले.

COMMENTS