Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महायुती 14 जानेवारीपासून मैदानात

राज्यभरात मेळावे, बुथनिहाय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई ः भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डडा यांनी लोकसभा निवडणुकीत 400च्यावर जागा निवडून आणण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात देखील महायुतीने लोकसभा न

शिवसैनिकांपेक्षा उद्धव ठाकरेंना शरद पवार अधिक प्रिय : केसरकर
वरखेड यात्रा नियोजनासाठी उद्या नगरला होणार बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं अक्षय कुमारला पत्र

मुंबई ः भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डडा यांनी लोकसभा निवडणुकीत 400च्यावर जागा निवडून आणण्याचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात देखील महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुती 14 जानेवारीपासून लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली. यासोबतच राज्यभरात मेळावे, बुथनिहाय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचही माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री दादा भुसे व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.  
यावेळी बोलतांना तटकरे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा आमचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलो आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा तिसर्‍यांदा केंद्रात सरकार स्थापन होणार आहे. हा विश्‍वास आम्हाला आहे. तर येणार्‍या 14 जानेवारी पासून राज्यभरात आमचे एकत्र कार्यकर्ता मेळावे पार पडतील, त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे मेळाव्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तर, बावनकुळे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात चांगले यश मिळेल, असा विश्‍वास आम्हाला आहे. 45 पेक्षा अधिक जागांवर महायुतीचा विजय होईल, असा आमचा निर्धार आहे. त्या अनुषंगाने आगामी काळात महायुतीतीत सर्व घटकपक्षांचे संयुक्त मेळावे पार पडणार आहेत. बावनकुळे म्हणाले की, तिन्ही पक्ष जेव्हा एकत्र आले. तेव्हापासून उर्वरित पक्षातून येणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या अतिशय झपाट्याने वाढ आहे. याचे एकमेव कारण म्हणजे मोदींजींवर असलेला लोकांचा विश्‍वास. राज्यातील सरकारवर असलेला विश्‍वास. तर पुढील काही काळात विरोधकांकडे फक्त नेते उरतील पण कार्यकर्ते दिसणारच नाही, असा टोला त्यांनी लगावला.

विधानसभेत 225 च्यावर महायुतीचे आमदार असतील – पक्षप्रवेशावर बोलतांना बावनकुळे म्हणाले, जेव्हा मोदी पुन्हा पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा महाराष्ट्रातील महायुतीचे 45 खासदार उभे असतील. विधान सभेत देखील 225 प्लस महायुती क्रॉस करेल. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला यश मिळेल.

COMMENTS