Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदाशिव लोखंडें यांच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

देवळाली प्रवरा ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आणि

ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

देवळाली प्रवरा ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा देवळाली प्रवरा येथे प्रचार शुभारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा आणि कार्यालयाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माञ नियोजित वेळ होऊनही कार्यकर्त्यांसह मतदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. गर्दी न जमल्याने त्यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आली. देवळाली प्रवरा सह 32 गावासाठी देवळाली प्रवरा शहरात महायुतीचे आघाडीचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले. या कार्यालयाचा शुभारंभ ठेवण्यात आला होता. परंतू सभेच्या ठिकाणी अवघे दहावीस कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी सात वाजे पर्यंत कार्यकर्ते व मतदारांची गर्दी होईल अशी आशा महायुतीच्या आघाडीच्या नेत्यांना होती. परंतू गर्दी न जमल्यामुळे अखेर महायुतीच्या आघाडीच्या नेत्यांना कार्यालय व प्रचार शुभारंभ कार्यक्रम रद्द करावा लागला.
                 या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. म्हणून विखे यांचे समर्थक दुपारपासून कार्यक्रम स्थळी हजर झाले होते. मात्र कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे व  खा.लोखंडें यांच्या वरील नाराजीमुळे या कार्यक्रमाकडे कार्यकर्त्यांसह मतदारांनी पाठ फिरवल्याची चर्चा होत होती. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असुन प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे व वंचितकडून उत्कर्षा रूपवते अशी तिरंगी लढत होत आहे. यादरम्यान प्रत्येक पक्षाकडून प्रचाराला वेग आला आहे. खा. सदाशिव लोखंडे यांची राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरासह 32 गावांमधे कमालीचा नाराजीचा सुर आहे. त्यामुळे या 32 गावांमधे प्रचार करण्याच्या उद्देशाने निवडणूक तोंडावर आल्यानंतर संपर्क कार्यालयाचा शुभारंभ तसेच कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 4 वाजता निश्‍चित करण्यात आली होती. त्यानुसार कार्यक्रमस्थळी सर्व तयारी करण्यात आली होती. माञ सायंकाळी सात वाजेपर्यंत भाजपाचे तुरळक कार्यकर्ते वगळता कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांसह मतदारांची गर्दीच न झाल्याने खा.लोखंडे यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे परस्पर नगर दक्षिणेत प्रचारासाठी निघुन गेले. तर कृषी मंत्री दादा भुसे हे श्रीरामपूर येथिल हेलिपँडवर उतरुन प्रमुख कार्यकर्त्यांची कानउघडणी करुन पुढील कार्यक्रमास निघुन गेल्याचे शिंदे गटाचे कार्यकर्ते आपआपसात चर्चा करताना बोलत होते. महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरला जाण्यापूर्वी प्रमुख कार्यकर्त्यांना व आयोजकांना खाजगीत चांगलेच झापल्याची चर्चा आहे. खासदार लोखंडे यांच्या कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचे ठिकाण नवीन कार्यालय समोर किंवा बाजार तळावर ठेवण्यात यावा असे चर्चेतून पुढे आले आहे.हा कार्यक्रम एका संस्थेच्या आवारात ठेवल्यामुळे व स्थानिक राजकीय कलहातून अनेक कार्यकर्त्यांसह मतदारांनी  या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा होत आहे.

COMMENTS