Homeताज्या बातम्या

श्रीगोंद्यातील सुपेकरमळा जिल्हा परिषद शाळेत उत्साहात पार पडला ‘प्रवेशोत्सव’; चिमुकल्यांचे औक्षण करून स्वागत

श्रीगोंदा : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेकरमळा (खेतमाळीसमळा), श्रीगोंदा येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा

शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; गेवराई तालुक्यातील देवीतांडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
नवे शैक्षणिक वर्ष; शाळा प्रवेशोत्सवासाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज, पहिल्याच दिवशी अधिकारी शाळांना देणार भेटी
शासकीय शाळांसमोर अस्तित्वाचे आव्हान! पहिलीच्या प्रवेशसंख्येत सलग घट; प्रत्येक बालक शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाची व्यापक मोहीम

श्रीगोंदा : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुपेकरमळा (खेतमाळीसमळा), श्रीगोंदा येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा ‘स्वागत प्रवेश सोहळा’ अत्यंत उत्साहात पार पडला. शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करत उत्साही वातावरणात स्वागत केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.

या स्वागत कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक वेठेकर, चोभे सर यांच्यासह स्थानिक पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचे आवाहन केले, तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही शाळेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे मत व्यक्त केले.

“शाळा ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया असून, पहिल्या दिवसापासूनच मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी या स्वागत समारंभाचे आयोजन केले जाते,” असे शिक्षकांनी स्पष्ट केले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात झाल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS