Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम

संस्थेच्या 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के

लोणी ः लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीच्या निकालात संस्थेने आपली शैक्षणिक गुणवता कायम राखली असून,

सेवानिवृत्त मुख्याध्यापक लावरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
जोपर्यंत बाई जीव देत नाही तोपर्यंत तिच्या म्हणण्याला राज्यात किंमत नाही-चित्रा वाघ I l LOK News 24

लोणी ः लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या इयत्ता बारावीच्या निकालात संस्थेने आपली शैक्षणिक गुणवता कायम राखली असून, संस्थेच्या 10 महाविद्यालयांनी  निकाल   100 टक्के निकालाची परंपरा यंदाही राखली आहे. विज्ञान 10 ,कला 2 वाणिज्य शाखेतील 4 तर किमान कौशल्य अभ्यासक्रम शाखेतील 2  महाविद्यालयांचा समावेश आहे.,प्रवरेच्या इंग्रजी माध्यमांच्या तीनही शाखांचा  निकाल 100 टक्के लागला असल्याची माहीती संस्थेच्या शिक्षण संचालिका लिलावती सरोदे यांनी दिली. लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या 17  कनिष्ठ महाविद्यालाने आपली निकालांची परंपरा कायम ठेवली आहे.

यावर्षी 2560 विद्यार्थी पैकी 2464 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थेचा कला शाखेच्या 12 महाविद्यालयाचा निकाल 85.13  लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी आणि कै.जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली या कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के लागला असून  कला शाखेतून 417 पैकी 355 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांचा निकाल 98.92 टक्के लागला असून मराठी माध्यमातील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पाथरे, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय बाभळेश्‍वर,डॉ.बाबासाहेब आंबडेकर कनिष्ठ महाविद्यालय,भगवतीपूर या तीन तर इंग्रजी माध्यमातील प्रवरा पब्लीक स्कूल प्रवरानगर,प्रवरा सेंट्रल पब्लीक स्कुल प्रवरानगर,पद्मश्री डॉ.विखे पाटील सैनिकी स्कुल,प्रवरानगर या तीनही महाविद्यालयांचा 100 टक्के लागला असून, 1851 पैकी 1831 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे सौ. सरोदे यांनी सांगितले. वाणिज्य शाखेचा निकाल हा 94.92 टक्के लागला असून डॉ.बाबासाहेब आंबडेकर महाविद्यालय भगवतीपूरचा  निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून 236 पैकी 224 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर किमान कौशल्य शाखेचा निकाल 96.43 टक्के लागला असून प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या कनिष्ठ महाविद्याल लोणी याचा निकाल 100 टक्के लागला. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, खा.डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांञिकचे संचालक डॉ.प्रदिप दिघे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी आभिनंदन केले.

जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत असल्याचा अभिमान ः ना. विखे – विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सर्वानीच केलेल्या सांघिक प्रयत्नामुळे अहील्यानगरची निकालाची परंपरा कायम राखली गेली आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा महमंडळाच्या निकालाची आकडेवारी पाहीली तर आपला जिल्हा गुणवेतत  तिसर्या क्रमांकावर आहे.याचाच अर्थ जिल्ह्याच्या शैक्षणिक परंपरेचा आलेख उंचावत आहे याचा सर्वानाच अभिमान असल्याचे नमूद करून जिल्ह्यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केले असून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे संस्थाचालक पालक यांचेही अभिनंदन केले आहे. 

COMMENTS