Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरा डाव्या कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी सोडण्याची मागणी

अन्यथा उद्या पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढण्याचा हिम्मतराव धुमाळ यांचा इशारा

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने उपलब्ध न झाल्यास शुक्रवार (ता. 2

राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी देवळातील प्रज्ञा आणि प्रगतीची निवड
भाजपच्या उत्तर विभाग उपाध्यक्षपदी पानसरे यांची नियुक्ती
स्पीड ब्रेकर व माहिती फलक लावण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

श्रीरामपूर : भंडारदरा धरणातून शेतीचे आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने उपलब्ध न झाल्यास शुक्रवार (ता. 24) रोजी सकाळी 10.00 वा. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली वडाळा पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
            निवेदनात म्हटले आहे की, भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. तथापी, धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. सबब मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे भरणे होवू शकणार नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही उभी पिके करपण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. वरील बाब लक्षात घेवून श्रीरामपूर भागात प्रवरा डाव्या कालव्यांना तातडीने पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात यावे. जेणेकरुन उभ्या पिकांचे भरणे होईल. सदरची कार्यवाही गुरुवार दिनांक 23 मे पर्यंत करण्यात यावी. अन्यथा शुक्रवार 24 मे  रोजी सकाळी 10.00 वाजता श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल. तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत कार्यालयास घेरावो करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS