Homeताज्या बातम्या

गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

नांदेड : नायगाव ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार आणि धक्कादायक कारभाराचा आणखी एक नमुना गुरुवारी समोर आला आहे. टेंभुर्णी येथील वडजे नामक ३५ वर्षीय व

निष्ठावंतांची अवहेलना: नांदेड भाजपमध्ये अंतर्गत वादाचा भडका; ८३ वर्षीय प्रा. गणपत राऊत यांचा महाप्रशिक्षण शिबिरात अवमान
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली ‘नेटवर्किंग’चा नवा उद्योग !डोहाळे जेवणापासून थेट ‘डेस्टिनेशन टूर’पर्यंतचा प्रवास चर्चेत
विधानपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

नांदेड : नायगाव ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार आणि धक्कादायक कारभाराचा आणखी एक नमुना गुरुवारी समोर आला आहे. टेंभुर्णी येथील वडजे नामक ३५ वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) रात्री तब्बल १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी वाहनाच्या (गाडीच्या) हेडलाईटच्या प्रकाशात करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नायगाव ग्रामीण रुग्णालयासह संपूर्ण आरोग्य विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी शवविच्छेदन ही अत्यंत महत्त्वाची न्यायवैद्यकीय (Forensic) प्रक्रिया मानली जाते. अशा प्रक्रियेसाठी आधुनिक साधनसामग्री, पुरेसा प्रकाश आणि आवश्यक तांत्रिक सुविधा असणे बंधनकारक असते. मात्र, नायगाव रुग्णालयात या मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन कक्षात वीजपुरवठा खंडित झालेला होता. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी वाहनाच्या हेडलाईटचा आधार घेऊन रात्रीच ही प्रक्रिया उरकून घेतली.

रुग्णालयात स्वतंत्र शवविच्छेदन कक्ष असताना जनरेटर किंवा इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था का नव्हती? रात्री उशिरा शवविच्छेदन करण्याची एवढी घाई का करण्यात आली? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली होती का, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपर्णा पप्पूळवाड आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला याबाबत माहिती होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे नायगाव हे नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांचे गाव असल्याने या प्रकरणाची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

COMMENTS