प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव अंतर्गत गावोगाव लसीकरण मोहीम

Homeताज्या बातम्याअहमदनगर

प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव अंतर्गत गावोगाव लसीकरण मोहीम

कोपरगाव शहर प्रतिनिधी-  तहसीलदार विजय बोरुडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच शहरातील प्रत्येक विभागात जोरदार लस

अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी सपत्नीक श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.
एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये जागृती सप्ताहाचा समारोप

कोपरगाव शहर प्रतिनिधी- 

तहसीलदार विजय बोरुडे यांच्या उत्कृष्ट नियोजनाने कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच शहरातील प्रत्येक विभागात जोरदार लसीकरण मोहीम सुरू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुक्यातील पूर्वभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगाव बोलका कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावात देखील ” कवचकुंडले अभियान ” अंतर्गत मोठ्या प्रमाणात खालील प्रमाणे गाव निहाय लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले 

असून तरी वय वर्ष १८ पूर्ण आसलेल्या पुढील नागरिकांनी  लसीचा पहिला डोस न घेतलेले किंवा दुसरा डोस घेणे बाकी असलेल्या पात्र नागरिकांनी आपल्या गावात शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली बडदे (आव्हाड) यांनी केले आहे.

शुक्रवार दि. ८ ऑक्टोबर २०२१ गाव निहाय उपलब्ध डोस तळेगाव ३००, पढेगाव ४००, दहिगाव बोलका १००, तिळवनी १००, शनिवार दि.९ ऑक्टोबर २०२१ रोजी आपेगाव १००, दहीगाव बोलका १००, लौकी ३०० ,ओगदी ३००,रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी आंचलगाव १००,शिरसगाव १००,दहीगाव बोलका १००,घोयेगाव १०० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहे.

COMMENTS